सध्या सर्वत्र दिवाळी पार्टीची धामधूम पाहायला मिळतेय. बॉलिवूडच्या सिनेतारकांची दिवाळी पार्टीसाठी मांदियाळी पाहायला मिळतेय. पारंपरिक लूक करून ही कलाकार मंडळी पार्ट्यांमध्ये सहभागी झाले आहेत. दिवाळी पार्टीचे हे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच सुष्मिता सेन हिने दिवाळी पार्टीसाठी लावलेली हजेरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. कारण नुकत्याच झालेल्या दिवाळी पार्टीत जेव्हा सुष्मिता सेन एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा हात धरताना दिसली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (Sushmita Sen Rohman Shawl)
त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओ वा फोटोंवरून सुष्मिता व रोहमन शॉल पुन्हा एकत्र आले आहेत आणि त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. २०२१ मध्ये जेव्हा अभिनेत्रीने रोहमन शॉलबरोबर ब्रेकअपची घोषणा केली तेव्हा चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या ब्रेकअपचे कोणतेही कारण त्यांनी सांगितलं नव्हतं. पण ब्रेकअपनंतरही रोहमन शॉल सुष्मिताच्या आयुष्याचा एक भाग राहिला. तो अनेकदा सुष्मिता आणि तिच्या मुलींबरोबर फिरताना दिसला.
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात याची कोणालाच कल्पना नव्हती. पण जेव्हा सुष्मिता रोहमन शॉलचा हात धरून दिवाळी पार्टीत पोहोचली तेव्हा त्यांना एकत्र पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. दोघांचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये सुष्मिताने रोहमन शॉलचा हात पकडला आहे. दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत. सुष्मिताला साडीत चालायला त्रास होत असल्याने रोहमन शॉल तिचा हात धरून चालताना दिसला. यावेळी सुष्मिताच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी खुलून आलं होतं. डिसेंबर २०२१ मध्ये सुष्मिता सेनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व रोहमन शॉल वेगळे झाल्याची घोषणा केली होती. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. २०१८ मध्ये जेव्हा रोहमनने सुष्मिताला इंस्टाग्रामवर मेसेज केला तेव्हा त्यांच्या नात्याची सुरुवात झाली.