शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षय केळकरने मुंबईत घेतलं नवं घर, कळव्यातील जुन्या घराचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “एकदा शेवटचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 30, 2023 | 3:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay Kelkar New Home

अक्षय केळकरने मुंबईत घेतलं नवं घर, कळव्यातील जुन्या घराचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "एकदा शेवटचं…"

‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकरने आजवर त्याच्या हटके स्टाईलने साऱ्या प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘बिग बॉस सिझन ४’ जिंकल्यानंतर अक्षयला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय अक्षयने ‘ढोलकीच्या तालावर’ या रिऍलिटी शोच्या निवदेनाची जबाबदारी पार पाडली. तसेच त्याच्या ‘दोन कटिंग’ या सीरिजनेही साऱ्यांच्या मनावर राज्य केलं. अक्षय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. (Akshay Kelkar New Home)

अक्षयने चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली आहे. अक्षयने नुकतंच त्यांचं कळव्यातील राहतं घर सोडून नव्या घरात पदार्पण केलं आहे. मुंबईत त्याने नवं घर घेतलं असल्याची माहिती त्याची बहीण श्रद्धा हिने दिली आहे. अक्षय केळकरने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो, त्याची आई आणि बहिण असे तिघेजण दिसत आहेत. त्यांच्या हातात काही बॅगाही पाहायला मिळत आहेत. बॅग हातात घेऊन काढलेला एक फोटो आणि त्यांच्या रिकाम्या घराचा फोटो शेअर करत “आम्हाला तुझी खूप आठवण येईल, पुन्हा एकदा शेवटचं, बाय कळवा घर” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “माझ्या माहेरसून…”, अंकुश चौधरीच्या बायकोचा ‘कोकण रत्न’ पुरस्काराने सन्मान, म्हणाली, “खूप खूश आसय कारण…”

या व्हिडीओला कॅप्शन देत त्याने “घर आठवणी”, असे म्हणत इमोजी शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यातील एका चाहत्याने “आता कुठे जाणार”, असे विचारले आहे. त्यावर त्याची बहीण श्रद्धाने “मुंबई” असं म्हणत उत्तर दिलं आहे. तर एकाने त्यांना “तुम्ही कळव्याचं घर सोडलं का?” असे विचारले आहे. त्यावर श्रद्धाने “हो” असं म्हटलं आहे. अक्षयने नवं घर घेतल्याची हिंट याआधी दिलीच होती.

View this post on Instagram

A post shared by shraddha (@shraddhakelkar27)

आणखी वाचा – “यावेळी खूपच व्हरायटी आहे”, बहुचर्चित ‘झिम्मा २’चा टीझर प्रदर्शित, गर्ल्स गँगची धमाल अन् रिंकू राजगुरूच्या लूकने वेधलं लक्ष

काही दिवसांपूर्वी अक्षयने बाप्पाचं चित्र रेखाटत कॅप्शन मध्ये लिहिलं होतं की, ““आता हे चित्र आयुष्यभर अशा ठिकाणी राहणार जिकडे मी आतापर्यंत बरंच काही पाहिलंय पण आता मात्र मी तिथे नसेन, बाप्पा मी तिथून जाणार आहे आणि तू तिथे असशील.” यावरूनच तो जुनं घर सोडणार असल्याचं कळलं होतं. त्यानंतर आता अधिकृतरीत्या त्याने ही बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अक्षय केळकरने काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरासाठी अर्ज केला होता. त्याने पहाडी गोरेगाव व मागाठाणेमधील घरांसाठी एकूण तीन अर्ज भरले होते.

Tags: akshay kelkarakshay kelkar new homebigg boss winnermarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Namrata Sambherao share her son Photo

“घरात पाऊल ठेवायच्या आधी...”, नम्रता संभेरावच्या लेकाने तिच्यासाठीच तयार केलाय नियम, म्हणाली, “गोड मिठी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.