‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये विशिष्ट धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकण्यात ती यशस्वी ठरली आहे. हास्यजत्रेच्या मंचावर तिने अनेक पात्र साकारली असून तिच्या प्रत्येक पात्रांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यामुळेच नम्रताचा आज मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ज्यातून ती तिच्या कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्याबाबत अनेकदा खुलेपणाने व्यक्त होताना दिसते. अभिनेत्रीला रुद्राज नावाचा लेक असून ती तिच्या लेकाबरोबरचे अनेक व्हिडीओज शेअर करत असते. आता तिने नुकताच तिच्या मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (Namrata Sambherao share her son Photo)
नम्रताने इंस्टाग्रामवर तिच्या लेकाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये हे दोघे अगदी आनंदी दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने लेक रुद्राजसाठी एक छानशी पोस्ट लिहिली आहे. ती या पोस्टमध्ये म्हणते, “तुझ्या चेहऱ्यावरील हे गोड हसू पाहिलं की माझं आयुष्य वाढतं. कारण मी घरी आल्यावर पळत येऊन दार उघडायचं आणि घरात पाऊल ठेवायच्या आधी घट्ट मिठी मारायची, हा आता त्याने त्याचा बनवलेला नियम आहे. त्यामुळे घरी जाण्याची ओढ लागते. कधी एकदा तो हसरा चेहरा, ती गोड मिठी अनुभवतेय असं होतं. आई तू माझा लाडका आहेस आणि तू माझी आई आहेस असं तुझ्या नाजूक आवाजात ऐकलं, की मला आई झाल्याचा अभिमान वाटतो.”
हे देखील वाचा – “माझ्या माहेरसून…”, अंकुश चौधरीच्या बायकोचा ‘कोकण रत्न’ पुरस्काराने सन्मान, म्हणाली, “खूप खूश आसय कारण…”
या व्हिडिओवर चाहते व नेटकरी कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया देत आहे. एक चाहता यावर म्हणाला, “तुम्ही दोघे खूप गोंडस आहात ताई.” तर अनेक चाहत्यांनी नम्रता व लेक रुद्राजवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एकूणच हा फोटो त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
हे देखील वाचा – “यावेळी खूपच व्हरायटी आहे”, बहुचर्चित ‘झिम्मा २’चा टीझर प्रदर्शित, गर्ल्स गँगची धमाल अन् रिंकू राजगुरूच्या लूकने वेधलं लक्ष
नम्रता संभेराव सध्या प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून नेहमीच दिसत असते. त्याचबरोबर, ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाच्या निमित्ताने ती ठिकठिकाणी दौरे करताना दिसते. आता ती मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली असून लवकरच तिचा ‘सलमान सोसायटी’ आणि ‘एकदा येऊन तर बघा’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरलेली आहे.