ओटीटीवरील प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ची यावर्षी बरीच चर्चा झाली होती. कारण, यंदाच्या पर्वात टीव्ही विश्वातील प्रसिद्ध कलाकारांसह अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले होते. याच शोमध्ये युट्युबर एल्विश यादवने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री केली होती. ज्यात त्याने आपला दमदार खेळ दाखवत या शोचे विजेतेपद पटकावले. शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर एल्विशच्या फॅन फॉलोविंगमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तो जिथे जातो, तिथे त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी होताना दिसते. दरम्यान, अनेक कारणांनी चर्चेत आलेला एल्विश आता एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल घेत त्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav Gets an Extortion Call)
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, २५ ऑक्टोबरला एल्विशला एक अनोळखी कॉल आला होता. ज्यात काही अज्ञातांनी त्याच्याकडून १ कोटी रुपये मागितले. दरम्यान, एल्विशला हा कॉल कोणी केला? हे त्याला माहित नाही. मात्र, हा कॉल वजीराबाद गावाजवळ आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, त्याने याप्रकरणी तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्या अज्ञातांवर गुरुग्रामच्या सेक्टर ५३ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे देखील वाचा – लग्नाच्या पाच वर्षांनी दीपिका पदुकोण व रणवीर सिंगच्या लग्नाचे खास व्हिडीओ व फोटो समोर, नेटकरी म्हणाले, “बाजीराव-मस्तानी…”
‘बिग बॉस ओटीटी’ फेम एल्विश यादव एक युट्युबर आणि व्लॉगर आहे. त्याने त्याच्या युट्युबरवरील व्हिडीओज आणि व्लॉगच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. नंतर तो ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री केली होती. ज्यात त्याने प्रसिद्ध कंटेन्ट क्रिएटर अभिषेक अभिषेक मल्हानला हरवत या शोचे विजेतेपद पटकावले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये मोठी वाढ झाली. याच प्रसिद्धीच्या जोरावर त्याला अनेक म्युझिक व्हिडीओ व चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले. एल्विशचे युट्युबवर दोन चॅनेल्स असून ज्यात त्याचे १४.५ मिलियनहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत.
हे देखील वाचा – “चांगले कार्य करताना…”, काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यावरुन प्रशांत दामलेंना नेटकऱ्याने सुनावलं, अभिनेत्याने दिलं उत्तर, म्हणाले, “उघडा…”
‘बिग बॉस ओटीटी’चे विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने दुबईत आलिशान घर खरेदी केले होते, त्याची माहिती त्याने व्लॉग्सच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली होती. विशेष म्हणजे, त्याच घरात त्याने त्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला होता. त्याचबरोबर, एल्विश त्याच्या आलिशान जीवनासाठी बराच चर्चेत असतो. त्याच्याकडे अनेक आलिशान कार्स असून ज्याची किंमत कोटींच्या घरात जाते.