बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत येतो. रणबीर सध्या त्याच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ठिकठिकाणी तो या चित्रपटाचं प्रमोशन करताना सध्या दिसतो. जेव्हा रणबीर स्पॉट होतो, तेव्हा तो अनेकदा पापाराझींवर चिडताना दिसतो. त्यामुळे तो अनेकदा ट्रोल झालेला पाहायला मिळाला. अशातच, अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला, ज्याची सध्या चर्चा होत आहे. (Ranbir Kapoor viral video)
एरव्ही पापाराझींवर चिडणारा रणबीर यावेळेस मात्र एका वेगळ्या अंदाजात दिसला. रणबीर नुकताच एका कामानिमित्त टी-सीरिजच्या ऑफिसवर पोहोचला. यादरम्यानचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये, तो कारमधून उतरत ऑफिसच्या दिशेने जाताना दिसतो. त्यावेळी पापाराझी त्याच्या फोटो घेण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसतात. त्यातीलच एक फोटोग्राफर एक झलक घेण्यासाठी त्याचा पाठलाग करताना दिसतो.
हे देखील वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! सुपरहीट ठरलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार, व्हिडीओ समोर
यावेळी रणबीरच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. पण त्याने आपली नाराजी लपवत त्या फोटोग्राफरचा मजेशीर अंदाजात हाथ पकडला. आणि लिफ्टमध्ये त्याला बरोबर घेऊन जातो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी यावर कमेंट करताना दिसत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “रणबीरने सर्वांसमोर त्या मुलाचे अपहरण केले आहे. मला त्याचा हा अंदाज आवडला.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तो खूप मैत्रीपूर्ण वागतोय.” एकूणच रणबीरच्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
हे देखील वाचा – रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये टायगर श्रॉफची धमाकेदार एन्ट्री! ‘सिंघम अगेन’चा फर्स्ट लुक समोर येताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
याआधीही रणबीरचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक व्हिडीओ चर्चेत आला होता. रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात, त्याच्यासह रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.