शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हॉलिवूड अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन, ऑस्कर पुरस्कारासाठी मिळाले होते नामांकन, एमी पुरस्काराने देखील केले होते सन्मानित

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 15, 2023 | 1:53 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hollywood Actress Piper Laurie Passed Away

हॉलिवूड अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे निधन

तीन वेळा ऑस्कर नामांकित आणि एमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाने हॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Hollywood Actress Piper Laurie Passed Away)

अमेरिकेतील मीडिया आउटलेट डेडलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, पाईपर लॉरी यांचे शनिवारी (१४ ऑक्टोबर) वयाच्या ९१ व्या वर्षी लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. हॉलिवूडमधील एकेकाळातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्या गणल्या जात होत्या. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर त्यांचे मॅनेजर रोसेनबर्ग यांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना सांगितले की, “पाईपर लॉरी या आमच्या पिढीतील एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व एक चांगली व्यक्ती म्हणून कायम स्मरणात राहतील.”

हे देखील वाचा – लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक, अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा पहिलं पोस्टर प्रदर्शित

PIPER LAURIE has passed away. We lose one of the great artists of the Golden Age of Hollywood, a wonderful woman. Rest in peace. pic.twitter.com/AVi2mk1EN9

— Black Lodge Cult (@BlackLCult) October 14, 2023

पाईपर लॉरी यांना तब्बल नऊ वेळा एमी पुरस्कार आणि तीन वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ‘ट्विन पीक्स’ या लोकप्रिय शोमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ओळखल्या जात होत्या. त्यांना याच शोमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी १९९० आणि १९९१ मध्ये एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

हे देखील वाचा – गायक डीनो जेम्सने पटकावले ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वाचे विजेतेपद, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला टाकलं मागे, मिळाली ट्रॉफी, कार व इतकी रक्कम

वयाच्या १८ व्या वर्षी युनिव्हर्सल स्टुडिओ मधून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली असून रोनाल्ड रीगन, रॉक हडसन, टोनी कर्टिस आणि न्यूमन अशा लोकप्रिय कलाकारांसह त्यांनी काम केलेलं आहेत. २०१८ मध्ये आलेल्या ‘व्हाइट बॉय रिक’ चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. त्यांच्या निधनाने हॉलिवूडसह त्यांचा मित्र परिवारावर शोककळा पसरली असून अनेक कलाकार विविध माध्यमांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.

Tags: emmy awardshollywood actressHollywood Actress Piper Laurie Passed Awayoscarspiper laurie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Pawandeep Rajan  Health
Entertainment

अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…

मे 10, 2025 | 10:48 am
Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Next Post
Swapnil Joshi produced a upcoming Movie

स्वप्नील जोशीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, पहिल्या चित्रपटाची केली घोषणा, म्हणाला, “आईचा आशीर्वाद…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.