मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट ‘बॉईज’च्या सिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मागील तिन्ही चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली होती. या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर आता पुढचा भाग म्हणजे ‘बॉईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर व ट्रेलरने पाहता चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.चित्रपटात जुन्या कलाकारांसह नवीन कलाकार मंडळी ही दिसत आहेत. (Gaurav more look and dialogue video)
चित्रपटातील प्रत्येकाचा लूक प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे गौरव मोरे याचं ‘नरवीर’ या नावाचं पात्र सध्या चांगलच गाजत आहेत. चित्रपटात गौरवची हटके भूमिका पाहायला मिळत आहेत. ट्रेलर पाहता त्याचा वेगळा अंदाज सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचे वाढवलेले केस, डोळ्यांवर चष्मा, कॉटन कुर्ता व चित्रपटातील वेगळेच डायलॉग प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्याचबरोबर ट्रेलरमध्ये तो हटके वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहेत. गौरवचा अभिनय, त्याने साकारलेलं पात्र, त्याची स्टाईल व त्याचे ते डायलॉग बरेच व्हायरल होत आहेत. चित्रपटातील त्याचं पात्र सगळ्यांच्या पसंतीस पडत आहेच पण चित्रपटातील त्यांच्या तोंडी बोल्ड डायलॉगही ऐकायला मिळत आहे.
त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत तो लिहितो, ‘पहाल तर हसाल आणि हा तर फक्त प्रोमो आहे. २० ऑक्टोबरपासून बॉईज ४ चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार’, असं लिहिलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी लिहितो, ‘भाऊ फक्त तुझ्यासाठी चित्रपट बघायला जाणार’, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं की, ‘आर बाप हसून हसून मरतो का काय आम्ही’, असं लिहिलं आहे. यावरून गौरवचं विनोदी पात्र प्रेक्षकांना बरंच आवडत असल्याचं दिसत आहे.
‘बॉईज ४’ येत्या २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. ली. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटअंतर्गत अवधुत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरूखकर यांनी केले आहे. तर लालासाहेब, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन ऋषिकेश कोळी यांनी केले आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सिनेसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे ज्याने चार भाग आले आहेत. यापूर्वी ‘बॉईज’च्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बरीच धुमाकुळ घातला होता. या चित्रपटातूनही वर्षी धैर्या, ढुंग्या व कबीर काय धमाल करणार आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे.