अनेक बॉलिवूड व गुजराती चित्रपटांमध्ये दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे आज निधन झाले आहे. त्या ६७ वर्षाच्या होत्या. गेल्या ६ महिन्यांपासून त्या कॅन्सरशी लढा देत होत्या. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. ८ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले असून त्यांच्या जाण्याने बॉलिवूड व गुजराती सिनेसृष्टी शोकसागरात बुडालेली आहे. (Bhairavi Vaidya Passed Away)
‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य या गेल्या ६ महिन्यांपासून कॅन्सर आजाराने ग्रस्त होत्या. मात्र, त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. भैरवी यांनी आपल्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी व गुजराती चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी ऐश्वर्या रे बच्चनसह ‘ताल’, सलमान खानसह ‘चोरी चोरी चुपके चुपके’, त्याचबरोबर ‘व्हॉट्स योर राशी’, ‘हमराज’, ‘क्या दिल ने कहा’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्याचबरोबर अलीकडे त्या निमा डेन्झोंगपा या हिंदी मालिकेतही झळकल्या होत्या. त्या मालिकेच्या कलाकारांनीही भैरवी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.
हे देखील वाचा – “तो खूप सिगारेट ओढायचा अन्…”, हर्षदा खानविलकरांनी सांगितलेली वडिलांची निधनापूर्वीची अवस्था, म्हणालेल्या, “बाबा गेला तेव्हा…”
यावेळी ‘स्कॅम १९९२’ फेम अभिनेता प्रतीक गांधीने भैरवी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना त्यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, “मला त्यांच्याबरोबर ‘व्हेंटिलेटर’ या गुजराती चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आम्हा दोघांची उत्तम बॉन्डिंग होती, त्या खूप प्रेमळ होता. मी त्यांना लहानपणी स्टेज आणि टेलिव्हिजनवर काम करताना पाहिले होते आणि त्यांच्या कामाचे मला खूप कौतुक वाटायचे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.” त्यांच्या निधनानंतर हिंदी सृष्टीतील अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत.