बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी कलाकारांनीही लाजा सोडल्या”, प्रिया बापटचे ‘ते’ बिकिनी फोटो पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर, म्हणाले, “कपडे काढून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 13, 2023 | 10:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
priya bapat troll

"मराठी कलाकारांनीही लाजा सोडल्या", प्रिया बापटचे 'ते' बिकिनी फोटो पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर, म्हणाले, "कपडे काढून..."

कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना नेहमीच अनेक प्रश्न पडलेले असतात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल ते नेहमीच सोशल मीडियावरून अपडेट देत असतात. अशातच काही असे कलाकार आहेत जे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे बरेचदा ट्रोलिंगला सामोरे जातात. या होणाऱ्या ट्रोलिंगवर बरेच कलाकार असे आहेत जे मोकळेपणाने बोलतात, तर काही कलाकार आहेत जे या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. अशातच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे एका मराठमोळ्या अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. ही अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. (priya bapat troll)

सध्या प्रिया बापट ही परदेशवारी करण्यात व्यस्त आहेत. मेलबर्न येथे प्रिया तिचा पती उमेश कामत व इतर मित्र मंडळींसह फिरायला गेली आहे. या परदेशवारी दरम्यानचे अनेक फिरतानाचे व मज्जा मस्ती करतानाचे फोटोस तिने सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. दरम्यान परदेशात जाऊन बिकिनी फोटोशूट केल्यामुळे प्रियाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. प्रिया नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते. अशातच तिने परदेशातील समुद्रकिनारी जाऊन केलेल्या फोटोशूटमुळे प्रिया नेटकऱ्यांच्या तावडीत सापडली आहे.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, सलमान खानसह अनेक बॉलिवूड कलाकारांबरोबर केले होते काम

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया ही तिच्या बिनधास्त व हटके स्वभावामुळे ओळखली जाते. फक्त अभिनय नाही तर तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अशातच प्रियाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोशूटमुळे तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “यातून नेमके काय साध्य करायचे आहे? इस्त्राईल मधल्या बळी पडलेल्या निष्पाप महिलांना विचारा, की प्रत्येक इंचाचा अर्थ व महत्व काय असतं ते. स्वतःच्या शरीराचा अभिमान असावा पण अतिरेक नको. शरीर सौष्ठव स्पर्धेत पण अंग दाखवतात.” तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “बाहेरील देशात गेलं की स्वतःच्या संस्कृतीला विसरून जातात लोक. मुळात बाहेर गेलं की बिकिनी शूट करणं हा काय प्रकार आहे. बर चला केलं तर केलं लोकांना का दाखवतात?” असा प्रश्न विचारत नेटकऱ्याने संताप दर्शविला आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “मराठी कलाारांनी पण आता लाजा सोडल्या देह भान राहिला नाही.”

आणखी वाचा – “तो खूप सिगारेट ओढायचा अन्…”, हर्षदा खानविलकरांनी सांगितलेली वडिलांची निधनापूर्वीची अवस्था, म्हणालेल्या, “बाबा गेला तेव्हा…”

प्रियाच्या या बिकिनी फोटोशूटवर अनेकांनी कमेंट करत संताप दर्शविला आहे. तर अनेकांनी प्रियाचं फोटोशूट पाहून मराठी अभिनेत्रींना सुनावले आहे. अद्याप तरी प्रियाने यावर काहीही भाष्य केलेलं नाही.

Tags: entertainmentmarathi actresspriya bapatpriya bapat photoshootpriya bapat troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Tanushree dutta file FIR against rakhi sawant

"तिच्यामुळे मी लग्न करु शकत नाही", तनुश्री दत्ताची राखी सावंत विरोधात पोलिसांत तक्रार, नाना पाटेकरांचाही केला उल्लेख, म्हणाली, "तिने मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.