ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या आजारपणाच्या अफवांमुळे चर्चेत आले होते. ८७ वर्षांचे धर्मेंद्र शेवटचे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर काही दिवसांसाठी ते सहकुटुंब अमेरिकेला गेले होते. तेव्हा त्यांच्या आजारपणाबाबत अनेक अनेक बातम्या आल्या होत्या. मात्र, ते बातमी खोटी असल्याचे सांगितले. त्यानंतर ते सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत अनेक व्हिडिओ शेअर करताना दिसतात. अशातच, धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये ते व्यायाम करताना दिसत आहे. (Dharmendra Workout Video)
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’नंतर धर्मेंद्र एका आगामी चित्रपटात झळकणार असून ते त्या चित्रपटाची तयारी करताना दिसत आहेत. याबद्दलचा एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सायकलिंग करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ते या वयात उत्साहाने व्यायाम करताना दिसतात. या व्हिडिओ ते असं म्हणतात की, मी सध्या चित्रपटासाठी तयार होत आहे. मला सायकलिंग करून अर्धा तास झाला असल्याचे सांगत ते त्यांच्या चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसतात. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला असून ते अभिनेत्याचे कौतुक करत आहे.
हे देखील वाचा – जिंकलस भावा! सांगलीमध्ये जाताच गौरव मोरेची ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी, ‘ते’ दृश्य पाहून अभिनेताही भारावला, सोशल मीडियावर होतंय कौतुक
Friends, With love to you all. pic.twitter.com/ISKdA3ubgQ
— Dharmendra Deol (@aapkadharam) October 11, 2023
बॉलिवूडचे ‘ही मॅन’ अशी ओळख असलेले धर्मेंद्र फिटनेस फिक्र आहे. जरी ते ८७ वर्षांचे झाले असले, तरी ते त्यांच्या फिटनेसकडे नेहमी लक्ष देतात. इतकंच नव्हे, तर अभिनेता सलमान खान त्यांना आपला फिटनेस गुरु मानतो. मध्यंतरी त्यांच्या आजारपणाबाबत अनेक चर्चा झाल्या होत्या. ते यासाठी अमेरिकेला गेले असल्याचेही त्यावेळी ऐकण्यात आले होते. पण, खुद्द अभिनेत्याने आपण व्यवस्थित असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला. ते सध्या अमेरिकेला परतले असून ते मोठ्या पडद्यावर परतण्यास सज्ज झाले आहे.