शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हॉटेल सुरु करायचं तुझं स्वप्न होतं पण…” अभिनेत्री माधुरी पवारच्या भावाचं निधन, म्हणाली, “नियतीच्या मनात…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 12, 2023 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
madhuri pawar brother passed away

madhuri pawar brother passed away

अभिनेत्री व नृत्यांगणा माधुरी पवार तिच्या नृत्यकलेसाठी विशेष ओळखली जाते. एका डान्स रिऍलिटी शोमधून आलेल्या माधुरीने तो शो गाजवला. त्यानंतर ती अनेक मालिका व वेबसीरिजमध्ये झळकली. माधुरीचा या क्षेत्रातील हा प्रवास अत्यंत खडतर होता. मात्र, प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने कलाक्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या या यशात तिच्या कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, माधुरी व तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीच्या भाऊ अक्षयचे नुकतेच निधन झाले आहे. त्याच्या जाण्याने माधुरीला मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. (Madhuri Pawar Post for her Brother)

माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या भावासाठी एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ती भावुक झालेली आहे. पोस्टमध्ये माधुरीने एक श्लोक लिहीत म्हणाली, “प्रिय अक्षय, तुला जाऊन बारा दिवस झाले… हे शब्दात व्यक्त करायची वेळ आली यासारखं दुर्दैव नाही. नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणी सांगू शकत नाही. उद्याचा दिवस कोणी पाहिला असं बऱ्याचदा आपण बोलतो. खरं आहे, उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुखद घटना घडण्यासापासून मी थांबवू शकली असती. तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की, तू नाहीस याची कल्पनाच सहन होत नाही. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत तुझी साथ होती, मग माझे इव्हेंट्स असो किंवा काही. तू माझ्यासोबत असायचास, बऱ्याचदा माझ्या वतीने माझ्या अनुपस्थित आपलं घर सांभाळलंस, घरच्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस. तुझा मला खूप आधार वाटायचा.”

“स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आपलं हॉटेल सुरु करायचं तुझं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं होतं ना. तू कोणालाही कधी ‘नाही’ असं बोलला नाहीस, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उभा राहिलास, कुठल्याही काला कमी लेखलं नाहीस, कुटुंबासाठी, मित्रांसाठी सदैव उभा राहिलास, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत तू आपलेपणाचं नातं तयार केलं होतस, कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाहीस, स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत झगडत राहिलास खरा पण कायम स्वतः पेक्षा बहिणींच्या कामाला प्रथम प्राधान्य दिलंस, या तुझ्यातील सर्व गुणांचा मला अभिमान होता आणि कायम असेल.”

हे देखील वाचा – “तुम्हाला हे शोभत नाही”, स्विमिंगपूलमधील बोल्ड फोटोंमुळे प्रिया बापटवर नेटकरी संतप्त, म्हणाले, “मराठी कलाकारांना असं पाहणं…”

“तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे मला काम करण्यासाठी वेगळी उर्जा मिळायची. बहिणींच्या प्रेमापोटी तुला भाऊ म्हणून जे-जे करणं शक्य होतं ते-ते तू केलंस. आई-बाबांचे संस्कार आणि आमच्या दोघांमधला समजूतदारपणा यामुळे आमच्यात कधी भांडणं झाली नाहीत. तू माझा लाडका होतास आणि कायम राहशील. गेली अनेक वर्ष रक्षाबंधन आणि भाऊबीज आपण उत्साहात साजरी करायचो, यंदाचे रक्षाबंधनचे तुझ्यासोबतचे क्षण आठवत आहेत, पण येत्या दिवाळीतील भाऊबीज आठवून अजून जास्त त्रास होतो. एका सावलीसारखा माझ्या सोबत असायचा, या पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?”

हे देखील वाचा – “म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा”, म्हणणाऱ्यावर भडकल्या ऐश्वर्या नारकर, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या, “म्हातारचाळ लागायचा रोग…”

“माझा नेहमी अट्टहास असायचा की अक्षय तुला जे काही पाहिजे जे जगाकडे याऐवजी माझ्याकडे माग. आजही तुला खूप काही द्यावसं वाटतंय, तुझ्या इच्छा ‘पूर्ण करावासा वाटत आहेत आणि ते मी नक्की करेन. मी नक्कीच गेल्या जन्मी पुण्य केलं असणार म्हणून या जन्मी मला तुझ्या सारखा भाऊ मिळाला पण तुझ्यासोबत आयुष्य अजून जास्त जगायला नक्कीच आनंद झाला असता… जिथे कुठे असशील तिथे देखील सगळ्यांना हसत खेळत ठेवशील याची मला खात्री आहे.”

View this post on Instagram

A post shared by Madhuri Pawar (@madhuripawarofficial)

“माझ्या करियरमध्ये तुझा सर्वात जास्त मोलाचा वाटा होता, मला एका मोठ्या उंचीवर तुला पाहायचं होतं, तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नक्की अजून मेहनत घेईन आणि कामाची जोमाने सुरुवात करेन. तुझी साथ, तुझं प्रेम, तुझा पाठिंबा माझ्या पाठीशी तसाच कायम ठेव! पण तुझी उणीव माझ्या मनात आणि आयुष्यात कायम राहणार अक्षु”, अशी ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे. माधुरीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, तिच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे.

Tags: madhuri pawarmadhuri pawar familymarathi actress
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Namrata Sambherao on Traffic Issues

घोडबंदर रोडवरील सततच्या ट्रॅफिकमुळे वैतागली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, म्हणाली, “अर्ध्या तासाच्या रस्त्याला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.