मराठीतील लोकप्रिय जोडी अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर बरीच चर्चेत आलेली आहे. सोशल मीडियावर या जोडीचे अनेक रिल्स तुफान व्हायरल होत असले. तरी, या रिल्समध्ये अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यांच्या आतापर्यंतच्या अनेक रिल्सला ट्रोलर्स विविध कमेंट करत त्यांना जोरदार ट्रोल करतात. पण अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या ट्रोलिंगवर नेहमीच सडेतोड उत्तर देताना दिसतात. अश्याच एका रीलवर एका नेटकऱ्याने ट्रोल केलं असता, त्या कमेंटवर अभिनेत्रीने उत्तर देत त्या ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहे. (Aishwarya Narkar replied to the trollers)
नारकर दाम्पत्य अनेकदा विविध ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स करताना दिसले. शिवाय ते नेहमीच योगा, व्यायामाचे व्हिडिओज त्यांच्या चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अविनाश व ऐश्वर्या यांनी पारंपारिक लूकवर एक रील पोस्ट केला होता. जो चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडला होता. मात्र, त्यांच्या या रीलवर काही नेटकरी अजूनही ट्रोल करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – नारकर कपलने डान्स केला तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?, त्यांना हिणवणारे तुम्ही कोण?
ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केला होता. ज्यामध्ये त्या अविनाश नारकरांसह एका गाण्यावर थिरकताना दिसल्या. पारंपारिक वेशभूषा परिधान केलेला हा रील शेअर होताच चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा जोरदार वर्षाव केला होता. मात्र, त्यांच्या या रीलवर एक युझरने “म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा” अशी कमेंट केली. त्याला रिप्लाय देताना ऐश्वर्या नारकर यांनी त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. “बुद्धी गंजेल असे विचार करून, तुमच्या घराण्यात म्हातारचाळ लागायचा रोग आहे वाटतं. जगून घ्या, गेलात तरसगळंच राहून जाईल दुसऱ्यांना बोलण्यात. म्हातारचाळ अर्थही बघून घ्या जरा… बुद्धी भ्रष्ट” असं म्हणत त्यांनी एक हसण्याचा इमोजी टाकला आहे.
हे देखील वाचा – “तुम्हाला हे शोभत नाही”, स्विमिंगपूलमधील बोल्ड फोटोंमुळे प्रिया बापटवर नेटकरी संतप्त, म्हणाले, “मराठी कलाकारांना असं पाहणं…”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. पण ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा या जोडीवर काहीही परिणाम होताना दिसत नसून ते सतत त्यांचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत राहतात. मध्यंतरी, अविनाश यांच्या एका ट्रेंडिंग गाण्यावरील रीलवर एक मीम व्हायरल झाला होता. पण ते मीम पोस्ट करणाऱ्या मीमपेजवर ऐश्वर्या यांनी संताप व्यक्त करताच ते मीम लगेच डिलिट करण्यात आला. एकूणच, आपल्या पतीवर होत असलेलं ट्रोलिंग पाहून ऐश्वर्या यांनी उचलेलं पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.