शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नारकर कपलने डान्स केला तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?, त्यांना हिणवणारे तुम्ही कोण?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 11, 2023 | 5:16 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Avinash narkar and aishwarya narkar troll

नारकर कपलने डान्स केला तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?, त्यांना हिणावणारे तुम्ही कोण?

तुम्ही पाहिलात का नारकर कपलचा डान्स? अहो तेच हो नारकर कपल ज्यांना तुम्ही गेले काही दिवस सतत ट्रोल करत आहात. “साठी बुद्धी नाठी”, “माकडचाळे”, “तुम्हाला शोभतं का?” असं बरंच काही नको नको ते बोलून तुम्ही सोशल मीडियावर तोंड सुख घेत आहात तेच नारकर कपल. अर्थात तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे तरीही सांगते अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांच्याबद्दल मी बोलत आहे. दोघांचेही रिल व्हिडीओ पाहून सतत आपलं ज्ञान पाजळणाऱ्या ट्रोलर्सची मला किव येते. किंबहुना त्यांच्यावर हसू येतं. खरंच या लोकांची विचार करण्याची क्षमता इतकी कमकुवत झाली आहे का? हाही विचार हळूच मनात डोकावतो.

इन्स्टाग्रामवर सतत हजारो मंडळी रिल व्हिडीओ शेअर करतात. त्यात कित्येक सेलिब्रिटींचाही समावेश असतो. सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ न पाहण्यासारखेही असतात. मग वाढत्या वयामध्ये स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगणाऱ्या नारकर कपलवर तुमचा राग का? दोघंही उत्तम कलाकार आहेत, नावाजलेले सेलिब्रिटी आहेत म्हणून तुम्ही त्यांना सुनावणार असाल तर तुमची वैचारिक दृष्टी कमकूवत आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लेकीला पंतप्रधान नेरेंद्र मोदींकडून पत्र, फोटो शेअर करत म्हणाली, “अभिमानाचा क्षण कारण…”

View this post on Instagram

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

आता तुम्ही म्हणाल आम्ही त्यांचे चाहते आहोत, एक कलाकार म्हणून आम्हीच त्यांना मोठं केलं आहे तर आम्हाला बोलायचा अधिकार आहे. अहो छे हो तुम्ही त्यांना कसंही बोलून हा अधिकार आधीच गमावला. काही दिवसांपूर्वी अविनाश नारकर गणेशोत्सवासाठी गावी गेले असताना त्यांनी सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर डान्स करताना दिसले. पण यातही तुम्ही त्यांनी या वयामध्ये ‘असं वागणं बरं नव्हे’, ‘वयाचा विचार करा’ म्हणून सल्ले दिलात. पण या वयातही दोघंही इतके फिट आहेत पाहून त्यांच्याकडून आदर्श घ्यावा असा विचार का नाही केला?

ऐश्वर्याही त्यांच्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करत नाहीत. अविनाश यांचंही अगदी तसंच आहे. नियमित व्यायाम, योगा दोघांचंही ठरलेलं. मग व्यायाम करत असतानाचे व्हिडीओ त्यांनी शेअर केले आणि त्यामाध्यमातून इतरांनाही व्यायाम करण्यासाठी प्रेरित केले तरी तुम्हाला ती चूक वाटते. बरं आता काहीजणं त्यांच्या या व्हिडीओचं कौतुक करतात. पण कित्येक मंडळी फक्त आणि फक्त टीकाच करतात.

आणखी वाचा – Video : ‘तू चाल पुढं’मधल्या शिल्पीचं नवीन घर आतून कसं आहे?, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “सगळे पैसे संपले म्हणून…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आतापर्यंत ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या यांनी कमेंट्सच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं आहे. पण एवढं करुनही ट्रोलर्स मात्र शांत बसलेले नाहीत. शूटिंगच्या गडबडीमध्ये, सतत कामात व्यग्र असताना स्वतःला आनंदी कसं ठेवायचं? हे तुम्ही या दोघांकडून शिकलं पाहिजे. फिटनेसबाबत तर तरुणाईलाही लाजवणारं हे कपल आहे. ते सेलिब्रिटी म्हणून तुम्ही त्यांना कसंही बोलता. पण आज वाढत्या वयातील मंडळींचे कित्येक ग्रुप तुम्ही सकाळी तुमच्या आजूबाजूच्या मैदानावर मॉर्निंग वॉक करताना, लाफ्टर क्लबमध्ये सहभागी होताना बघत असाल. इतकंच काय तर वयाची चाळीशी ओलांडलेल्या बऱ्याच महिला आज डान्स क्लासला जातात, योगा क्लासला जातात, विविध व्हिडीओ बनवत सोशल मीडियावर अपलोड करतात. मग त्या महिलाही ‘माकडचाळे’ करतात का? हा प्रश्नही अनुत्तरित आहे. नारकर कपल आता ज्या वयामध्ये अगदी आनंदाने, उत्साहाने काम करतात ते तुम्हाला तरुणवयामध्ये तरी जमतंय का? किंवा वाढत्या वयामध्ये जमणार का? ते पडताळून पाहा. आणि नसेल जमत तर किमान बोलताना दहावेळा तरी विचार करा एवढीच इच्छा…

Tags: Actor avinash narkaractress aishwarya narkarmarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aishwarya Narkar replied to the trollers

"म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा", म्हणणाऱ्यावर भडकल्या ऐश्वर्या नारकर, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या, "म्हातारचाळ लागायचा रोग…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.