गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोल दरवाढीचा मुद्दा बराच गाजत आहे. मनसे पक्ष या मुद्द्यावर प्रचंड आक्रमक झाली असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः याकडे विशेष लक्ष देत आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी या मुद्द्यावर व्यक्त होताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने टोल दरवाढीच्या मुद्द्यावर एक ट्विट केलं होतं, ज्याची जोरदार चर्चा रंगली. पण, या ट्विटनंतर अभिनेत्रीच्या ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टिक काढून टाकण्यात आली आल्यामुळे तेजस्विनी प्रचंड संतापली आहे. (Tejaswini Pandit twitter blue tick removed)
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित अभिनयासह सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडत असते. पण, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने काही दिवसांपूर्वी टोलसंदर्भात एक ट्विट केलं होतं. ज्यात तिने देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तिचं हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांतच तिच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. या कारवाईवर तेजस्विनी चांगलीच भडकली असून तिने नुकतीच एक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.
“कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही !” असं या पोस्टला शीर्षक देत तेजस्विनी म्हणाली, “काही लोकांना माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून त्यांनी माझ्या ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची’ इतकी वर्ष फसवणूक झाली, असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? जर ट्विटर अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, किंवा हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीने माझा किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश काय कमी होणार नाही.”
हे देखील वाचा – कित्येक वर्ष मानसिक आरोग्यासाठी आमिर खान लेकीसह घेत आहे उपचार, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “लाज वाटण्यासारखं…”
“सामान्यांचा आवाज बंद करणे हाच यांचा बहुदा एकमात्र एक्स फॅक्टर आहे, हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीही बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे! जय हिंद जय महाराष्ट्र!”, असं तेजस्विनी या पोस्टमध्ये म्हणाली. तिची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत असून नेटकरी यावर आपलं मत व्यक्त करत आहे.
हे देखील वाचा – पहिल्या पत्नीच्या निधनानंतर केलं दुसरं लग्न, तिलाही गमावलं अन्…; सध्या भूषण कडू आहे कुठे?
#महाराष्ट्र #टोलधाड #लोकशाही_धाब्यावर #NoDemocracy #MaharashtraPolitics pic.twitter.com/Y5UHyIVO6S
— TEJASWWINI (@tejaswwini) October 10, 2023
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तेजस्विनीने देवेंद्र फडणवीस यांचा टोलबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने सरकारवर निशाणा साधला होता. ती यात म्हणाली होती की, “म्हणजे… यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलत आहेत? मग इतके वर्ष आम्ही टोल भरत आहोत तो कोणाच्या खिशामध्ये जात आहे. राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा. या टोल धाडीमधून महाराष्ट्राला वाचवा. माननीय उपमुख्यमंत्री असं विधान कसं करू शकतात? तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा”. या ट्विटनंतर झालेल्या कारवाईवर आपला संताप व्यक्त केला असून हे प्रकरण आता कुठपर्यंत पोहोचणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.