अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ती सध्या तिचा पती व मुलीसह अमेरिकेत राहते. त्याचबरोबर, ती कामाबरोबरच तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकदा चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीची आई मधू चोप्रा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. त्या कधी लेक व जावयासह ट्रीपवर जाताना दिसल्या आहेत, तर कधी नातीबरोबर खेळताना. त्याचे फोटोज अनेकदा व्हायरलदेखील झालेले आहेत. पण, आता अभिनेत्रीची आई यावेळेस त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेत आल्या आहेत. (Priyanka Chopra Mother troll)
प्रियांकाची आई मधू चोप्रा नुकताच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचा पारदर्शक टॉप आणि ट्रॉउजर परिधान केला होता. जेव्हा त्या कार्यक्रमातून बाहेर पडल्या, तेव्हा त्या एका मैत्रिणीशी बोलताना दिसल्या. त्यानंतर काही पापाराझींनी त्यांचे फोटोज घेत होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा – आधी माफी मागितली, आता पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये दिसला अक्षय कुमार, नेटकरी भडकले, म्हणाले, “पैशांसाठी तो…”
या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, “अश्लीलतेची हद्दच पार केली आहे.” त्याचबरोबर आणखी एका नेटकऱ्याने “अंतर्वस्त्र दिसत आहे.”, अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने “प्रियांका तू पाहिलंस का तुझ्या आईने काय परिधान केलं आहे.”, अशी कमेंट करत प्रियांकावर निशाणा साधला आहे. मात्र, एकाने “त्या स्वत: एक डॉक्टर असून त्यांची लेक ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांच्या जागी पोहोचण्याचा तुम्ही विचारही करू शकत नाहीत. मग त्यांच्या विरोधात बोलून काय मिळणार आहे.”, अशी कमेंट करत त्यांचे समर्थन केले आहे.
हे देखील वाचा – “मग टोल कोणाच्या खिशात जातोय”, देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करत भडकली तेजस्विनी पंडित, म्हणाली, “राजसाहेब…”
अभिनेत्रींच्या आईबद्दल बोलायचे झाल्यास, मधू चोप्रा या पेशाने डॉक्टर आहे. त्याचबरोबर त्या यशस्वी उद्योजिका देखील असून त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली आहे. काहीच दिवसांपूर्वी त्या मुलांसह परिणीती चोप्राच्या विवाहसोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.