रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नेमकं त्याच दिवशी आमच्या घरातलं…”, रिमा लागू यांची ‘ती’ इच्छा पूर्ण न करू शकल्याची सुहास जोशी यांना खंत, म्हणाल्या, “रिमा तुझ्यासाठी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 8, 2023 | 1:56 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Suhas joshi talk about reema lagoo last wish

Suhas joshi talk about reema lagoo last wish

मराठी चित्रपटसृष्टीतसह हिंदी चित्रपटातही आपली वेगळी जागा निर्माण करणाऱ्या  अभिनेत्री म्हणजे रिमा लागू. २०१७मध्ये त्यांनी अचानक जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही अजरामर आहेत. त्यांच्या भूमिकेतून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला एक अजरामर ‘ग्लॅमरस आई’ दिली. ९० च्या दशकातील प्रत्येक चित्रपटात नायकाच्या आईच्या भूमिकेत रिमा लागूच दिसायच्या. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून दमदार काम करत त्या आईच्या भूमिकेतून सुपरहिट ठरल्या. त्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत. (Suhas joshi talk about reema lagoo last wish)

अशीच एक आठवण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी सांगितली. एका कार्यक्रमात त्यांना रिमा लागू यांना एक गोष्ट देता आली नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. त्यावेळी त्या भावूक झाल्या होत्या.सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात त्यांनी रिमा लागूबद्दल बऱ्याच आठवणी सांगितल्या. त्यावेळी त्यांनी एक गोष्ट सांगत खंत ही व्यक्त केली. याबद्दल बोलताना सुहास जोशी म्हणाल्या, “अगदी शेवट शेवटची गोष्ट मला आठवते आहे. स्वाती, रिमा माझ्याकडे राहायला आल्या होत्या. काही तरी नवीन करू असं बरंच काही सांगत आम्ही गप्पाही मारल्या. रिमा सकाळी उठली आणि मला म्हणाली की तिला ज्वारीची उकड खायची आहे. तिने याबाबत खूप ऐकलं आहे पण कधी खाल्ली नाही. मी त्यासाठी तिला लगेच होकारही दिला पण नेमकं त्याच दिवशी आमच्या घरातलं ज्वारीचं पीठ संपलं होतं”.

आणखी वाचा – “आम्हाला मूल नको…” प्रार्थना बेहेरेने केलं स्पष्ट भाष्य; म्हणाली, “आमच्या कुटुंबियांना वाटतं की…”

पुढे सुहास म्हणाल्या, “मी तिला म्हणाले तुला मी उकड करून देईन पण त्यासाठी तुला माझ्या घरी पुन्हा यावं लागेल. त्यानंतर जे काही घडलं आमची भेट परत होऊच शकली नाही आणि ती गेली. ती गेली त्यादिवशी मला पहिलं रडू आलं ते या गोष्टीचं की मला तिला ज्वारीचं उकड खायला देऊ नाही शकले. अजूनही कधी घरात ज्वारीची उकड केली तर रिमा तुझ्यासाठी गं म्हणून मग मी खायला सुरु करते”, असं म्हणत त्यांनी रिमा यांना ज्वारीचं उकड खायला घालू शकले नाही ही खंत आजही लागून राहिली आहे.

आणखी वाचा – लंडनमधील थंडीमुळे ‘अशी’ झाली कलाकारांची अवस्था, व्हिडिओ शेअर करत स्वप्निल जोशी म्हणाला, “पॅकअपनंतर जेवायला गेलो आणि…”

रिमा लागू यांनी ‘कलयुग’ या हिंदी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. हिंदी चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्री व आईच्या भूमिका केल्या. पण त्या भूमिका चांगल्याच गाजल्या. त्यांनी नाटक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता. ‘सविता दामोदर परांजपे’, ‘घर तिघांचे हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’ अशा बऱ्याच नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

Tags: last wishmarathi actressreema lagoosuhas joshi talked on evergreen actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
nushrratt bharuccha is safely return in india

Video: इस्त्रायलमधून सुरक्षितरित्या भारतात पोहोचली नुसरत भरुचा, 'अशी' झाली अवस्था, म्हणाली, “मला घरी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.