मराठी मालिकांमधून नावारुपाला आलेला चेहरा म्हणजे प्रसाद जवादे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ कार्यक्रमापासून प्रसादच्या कलाक्षेत्रातील प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘माझीया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही प्रसादने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये त्याची खरी बाजू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. आता पुन्हा एकदा तो मालिकांकडे वळला आहे. त्याच्या नव्या मालिकेबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. (Prasad Jawade exits Kavyanjali Serial)
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘काव्यांजली-सखी सावली’ मालिकामध्ये प्रसाद मुख्य भूमिकेमध्ये होता. काही महिन्यांपूर्वी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. काही दिवसांमध्येच मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. ‘काव्यांजली’मधील काव्या आणि अंजलीच्या पात्रांना प्रेम मिळालं. त्याचबरोबर प्रीतम या मुख्य नायकाच्या पात्रालाही प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळताना दिसलं.
हे देखील वाचा – ४५ दिवस हनिमूनला गेली होती प्रार्थना बेहरे, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “हनिमूनवरुन आल्यानंतर नवऱ्याला एकच प्रश्न पडला की…”
प्रसाद या मालिकेत प्रीतम हे पात्र साकारत होता. मात्र आता प्रसादने ही मालिका सोडली असून त्याच्या जागी आता अभिनेता आदिश वैद्य या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याने ही मालिका का सोडली? याचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र लवकरच तो नव्या मालिकेमध्ये काम करणार असल्याचं बोललं जात आहे.
हे देखील वाचा – “तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला”, आजोबांच्या निधनानंतर गौतमी देशपांडेची भावुक पोस्ट, म्हणाली, “स्वतःचे वडील जाण्यापासून…”
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकलेल्या प्रसादने ‘काव्यांजली’ मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्ये पुढे असताना प्रसादने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता तो कोणत्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.