शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

४५ दिवस हनिमूनला गेली होती प्रार्थना बेहरे, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “हनिमूनवरुन आल्यानंतर नवऱ्याला एकच प्रश्न पडला की…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 23, 2023 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
prarthana behere honeymoon

४५ दिवस हनिमूनला गेली होती प्रार्थना बेहरे, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “हनिमूनवरुन आल्यानंतर नवऱ्याला एकच प्रश्न पडला की...”

अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रार्थना बेहरे. मोठ्या पडद्यावर तिने साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना आपलसं केलं. मितवा, कॉफी आणि बरंच काही, मस्का यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने कौतुकास्पद काम केलं. पण लग्नानंतर प्रार्थना चित्रपटांमध्ये फार दिसली नाही. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमधून तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. मात्र तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. याचबाबत तिने आता भाष्य केलं आहे. (Prarthana Behere Talk About Her Honeymoon)

लग्नानंतर प्रार्थनाचं वजन वाढलं होतं. याचविषयी ‘मित्र म्हणे’या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना म्हणाली, “२०१७मध्ये माझं लग्न झालं. लग्नाच्या आधी एका वर्षात चार ते पाच चित्रपट मी करत होते. त्याचदरम्यान लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर मी बऱ्याच चित्रपटांना नकार दिला. कारण लग्न केल्यानंतर मला माझ्या नवऱ्याबरोबर आयुष्य एण्जॉय करायचं होतं. म्हणून मी ब्रेक घेतला. पण एवढा मोठा ब्रेक मिळेल असं मला वाटलं नव्हतं. लोक विसरले की, प्रार्थना बेहरेही होती”.

आणखी वाचा – Video : मेकअप रुम, आकर्षक इंटेरियर अन्…; इतकं मोठं व आलिशान आहे सई ताम्हणकरचं नवं घर, म्हणाली, “१५ वर्ष सतत काम केल्यानंतर…”

“मोठा ब्रेक झाला याचं सगळ्यात मोठं कारण होतं की, मी खूप जाडी झाली. त्यामुळे लोकांना असं वाटू लागलं की, लग्नानंतर हिने काम बंद केलं, ही जाड झाली म्हणजे गरोदर असणार. टिपिकल मुलींबाबत जो विचार करतात हिचं करिअर आता संपलं असेल तोच विचार माझ्याबाबत करण्यात आला. प्रार्थनाचा नवराच दिग्दर्शक-निर्माता आहे ती आपल्याबरोबर कशाला काम करेल असंही अनेकांना वाटू लागलं होतं. असं करता करता २०१९पर्यंतही मला चित्रपट आला नाही. मात्र त्यावेळी खरंच माझ्याकडे माझ्या नवऱ्याची हिंदी वेबसीरिज होती. तीन वर्ष मी कुठेच दिसली नाही याची मला करोना काळात जाणीव झाली”.

आणखी वाचा – Video : प्रथमेश लघाटेने स्वयंपाक घरात बसून बनवले उकडीचे मोदक, सुकन्या मोने म्हणाल्या, “तुझ्यासारखा…”

View this post on Instagram

A post shared by Prarthana ???? (@prarthana.behere)

“तुझं वजन इतकं कसं वाढलं?” असा प्रश्नही प्रार्थनाला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “मला फक्त एण्जॉय करायचं होतं. जवळपास ४५ दिवस मी हनिमूनला गेले होते. हनिमूनला जाताना मी बारीक होते. पण आल्यानंतर मी आधीची प्रार्थना नव्हते. माझ्या नवऱ्याचंही त्यानंतर असं झालं की, नक्की मी एका अभिनेत्रीबरोबरच लग्न केलं आहे ना?. पण पहिल्यापासून कधीच मी माझ्या वजनाचा विचार केला नव्हता. कारण मी जशी होते तसं मला लोकांनी स्वीकारलं”. प्रार्थना आता तिच्या कामामध्ये अधिकाधिक लक्ष देत आहे.

Tags: marathi actressmarathi moviemarathi serialprarthana behere
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Prasad Jawade exits Kavyanjali Serial

काही महिन्यांमध्येच ‘काव्यांजली’ मालिकेमधून प्रसाद जवादेचा काढता पाय, पण यामागचं नेमकं कारण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.