राखी सावंत व आदिल खान दुर्रानी यांच्यात बऱ्याच दिवसांपासून जोरदार भांडण सुरू आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. राखी व आदिल एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसतात. राखीने केलेल्या आरोपांमुळे आदिल खानला तुरुंगातही जावं लागलं. हे सर्व प्रकरण ताज असताना आता यांत अभिनेत्री तनुश्री दत्तानेही या प्रकरणात उडी घेतली आहे. २०१८ मध्ये MeToo चळवळीत तनुश्री दत्ता खूप सक्रिय होती आणि तिने नाना पाटेकर यांच्यावर अनेक आरोप ही केले होते. त्यानंतर आता तिने राखी सावंतवर गंभीर आरोप केले आहेत. तनुश्री दत्ताने राखी सावंतमुळे दोन मुलांच्या जीवावर बेतलं असल्याचं विधान केलं. (Tanushree Dutta On Rakhi Sawant)
MeToo चळवळीदरम्यान राखी सावंतने तनुश्री दत्तावर अनेक गंभीर आरोप केले होते, तसेच काही व्हिडिओही बनवले होते, अशी माहिती आहे. राखी सावंतने तनुश्री दत्ता ही लेस्बियन असून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा दावाही केला होता. तनुश्री दत्ता तिला रेव्ह पार्ट्यांमध्ये घेऊन जायची, असेही राखीने म्हटले होते. त्यानंतर तनुश्री दत्ताने आपली बाजू मांडली होती. आणि आता त्यांच्यातील हा वाद पुन्हा एकदा पेटला असून तनुश्री दत्ताने राखीवर गंभीर आरोप केले आहेत.
तनुश्री राखीबाबत बोलताना म्हणाली की, “मला संपूर्ण देशाला सांगायचे आहे की राखी मनोरुग्ण व लबाड आहे. माझ्या चारित्र्याबद्दल ती जे काही बोलली आहे ते सर्व काही बनावट, खोटे होते. आज मला संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला किंवा तिचे नाव माहीत असलेल्या प्रत्येकाला सांगायचे आहे की, ती खूप खोटी आहे. ती दर पाच मिनिटांनी खोटे बोलते. तिची पातळी इतकी खालावली आहे की, तिच्या पातळीवर जाऊन ती पुढे काय करेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही.”
तनुश्री असंही म्हणाली की, “राखी सावंतला काही मानसिक आजार आहेत. तिने मला ज्या प्रकारची गोष्ट सांगितली तशी कोणी कल्पनाही करू शकत नाही. मला धक्का बसला होता. तिच्या पाच लग्नांवरही मला शंका आहे. तिला पुरुषांमध्ये रस नाही. ती लोकांवर आरोप करत राहते. ती खोटे बोलते.”
तनुश्री दत्ताने पुन्हा राखी सावंतच्या भूतकाळातील एक भयानक गोष्ट उखरुन काढली. तिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्याचा दावा केला. तनुश्रीने सांगितले की, “त्या पीडितांना राखी सावंतचा सामना करायचा नव्हता. याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी राखी सावंतवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तनुश्रीने सांगितले की, राखी सावंतवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”