गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लग्नापूर्वीची आफ्रिका ट्रीप, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 21, 2023 | 7:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swanandi Tikekar and Ashish Kulkarni first Africa Trip

स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लग्नापूर्वीची आफ्रिका ट्रीप, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या मराठी मनोरंजनविश्वात अशी अनेक जोडपी आहे, जी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी. काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर हे दोघे अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसत असून नुकतीच ही जोडी आफ्रिकेची सफारी करताना दिसली आहे. (Swanandi Tikekar and Ashish Kulkarni first Africa Trip)

स्वानंदी व आशिष काही दिवसांपूर्वी त्यांच्या मित्रांसह केनियाच्या दौऱ्यावर गेले होते. या जोडीचा हा पहिला परदेश दौरा असून तिथल्या प्रवासातील काही सुंदर क्षण अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. अशातच आता तिने याच दौऱ्यादरम्यानचा आणखी एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वानंदी व आशिष त्यांच्या मित्रांबरोबर दिसत आहे. या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील काही खासगी क्षण शेअर करण्याबरोबरच तिथल्या निसर्गरम्य वातावरणातील काही फोटोज या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे.

हे देखील वाचा – “माझ्याबरोबर काय काय घडलं हे…”, पडत्या व अवघड काळात अमृता खानविलकरला आला स्वामींचा अनुभव, म्हणाली, “रोज मठात जायचे आणि…”

स्वानंदीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय, “धन्यवाद केनिया तुझी ही आमच्यासोबत पहिली ट्रिप होती.” स्वानंदी व आशिषचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. काही दिवसांपूर्वी स्वानंदी व आशिषने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Swanandi ???? (@swananditikekar)

हे देखील वाचा – ‘कट्यार’नंतर लवकरच संगीतमय चित्रपट घेऊन येणार सुबोध भावे, शेअर केला व्हिडिओ, म्हणाला, “प्रयत्नाला यश…”

दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, स्वानंदी काही महिन्यांपूर्वी ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकेत झळकली होती. सोशल मीडियावर तिच्या फोटोशूट्सची नेहमीच चर्चा होत असते. तर गायक आशिष कुलकर्णीने आपल्या आवाजातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं असून त्याने सारेगमप, इंडियन आयडॉल यांसारखे रिऍलिटी शो गाजवलं आहे.

Tags: ashish kulkarniswanandi tikekarSwanandi Tikekar and Ashish Kulkarni first Africa Trip
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Tanushree Dutta On Rakhi Sawant

"कंटाळून त्यांनी आत्महत्या…", तनुश्री दत्ताचे राखी सावंतवर गंभीर आरोप, म्हणाली, "राखीला मानसिक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.