सगळीकडे सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांसह नाटक व मालिकांमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी लाडक्या बाप्पाचे जल्लोषाचे स्वागत केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या घरी मोठ्या उत्साहात गणरायाचं स्वागत केलं आहे. त्यानिमित्ताने नुकतेच तिने एक फोटोशूट केलं असून या फोटोजवर एका चाहत्यांच्या हटके कमेंटला अभिनेत्रीने उत्तर दिलं आहे. (Netizens comment on Sonalee Kulkarni Post)
२०२० मध्ये सोनाली कुल्कर्णीने कुणाल बेनोडेकरशी विवाह केला. तिचा पती कुणाल नोकरीनिमित्त परदेशात असून कधी तो तिला भेटायला भारतात येतो. तर परदेशात ती त्याच्याबरोबर नेहमीच असते. दरवर्षी गणेशोत्सवाला सोनाली तिच्या माहेरी येते. यावेळी बाप्पाच्या स्वागताची तयारी करताना स्वतःच्या हाताने ती गणरायाची मूर्ती घडवते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोनाली तिच्या घरी आली असून तिने बाप्पाच्या आगमनाचा एक व्हिडिओ युट्युबवर शेअर केला होता. त्याचबरोबर तिने खास फोटोशूटदेखील केला आहे. याचे फोटोज तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.
हे देखील वाचा – ‘बॉईज ४’चं पोस्टर्स प्रदर्शित, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हे’ दोन कलाकार झळकणार, समीर चौघुले म्हणाले, “भावा…”
शेअर केलेल्या या फोटोजमध्ये सोनाली पारंपरिक वेशभूषेत अगदी खुलून दिसत असून तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स व कॅमेंट्सचा वर्षाव करत आहे. दरम्यान, या फोटोशूटवर एका नेटकऱ्याने कमेंट करत तिचा पती कुणालबद्दल विचारलं असता अभिनेत्रीने त्यावर उत्तरदेखील दिलं आहे. एका नेटकऱ्याने सोनालीला विचारलं की, “तुझे पती कुणाल कुठे आहे? दुबई की लंडनला?’ त्याला उत्तर देताना सोनाली म्हणाली, “तो सध्या दुबईमध्ये आहे.”
हे देखील वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी जल्लोषात केली बाप्पाची आरती, व्हिडीओ होतोय सर्वत्र वायरल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीत प्रचंड सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘डेट भेट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लवकरच ती ‘मलैकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे फोटोज व व्हिडिओज शेअर करत असते.