रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कठोर निर्णय, वाद…”, ‘झी मराठी’मध्ये जॉब करत होता अद्वैत दादरकर, राजीनामा दिल्यानंतर म्हणाला, “जास्त अपयशच आलं आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 19, 2023 | 6:17 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
adwait dadarkar resigned from zee marathi

adwait dadarkar resigned from zee marathi

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक म्हणून ज्याला ओळकलं जातं तो म्हणजे अद्वैत दादरकर. ‘अगंबाई सूनबाई’ या झी मराठी वाहिनीवरील सोहमच्या भूमिकेतून घरघरांत पोहोचत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. अद्वैतचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्याने नुकतीच एक शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. (adwait dadarkar resigned from zee marathi)

अद्वैतने आताच इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याने २०२२मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीच्या फिक्शन हेडची जबाबदारी स्वीकारली होती. त्याने झी वाहिनीबरोबर साधारण दीड वर्ष काम केलं. यानंतर आता तो अधिकृतरित्या या जबाबदारीतून मुक्त झाला आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.

View this post on Instagram

A post shared by Adwait Dadarkar (@adwaitdadarkarofficial)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच सुरु करणार स्वतःचं हॉटेल, गणपतीनिमित्त केली घोषणा, म्हणाली, “उद्योजिका म्हणून…”

अद्वैतने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्याने मागील दीड वर्षातील क्षण शेअर केले आहेत. त्याला कॅप्शन देत तो लिहीतो, ‘‘झी मराठी’ माझ्यासाठी चॅनल नाही तर Emotion आहे या पुढेही असेल. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मी कधी Corporate job करेन. पण ९ मार्च २०२२ ते १९ सप्टेंबर २०२३ हे साधारण दीड वर्ष हा प्रवास केला. Zee Marathi – Fiction Head एवढी मोठी जबाबदारी त्यासाठी सर्वात आधी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. यासाठी PM Sir, अमित सर, निलेश मयेकर, कल्याणी सगळ्यांचे मनापासून आभार. संपूर्ण दीड वर्षात प्रचंड काम केलं. कधी थकलो, कधी समाधान मिळालं, कधी यश मिळालं. जास्त तर अपयशच मिळालं. धडपडलो, भांडलो, वाद घातला, कधी कठोर निर्णयही घ्यावे लागले. या सगळ्यात एक माणूस म्हणून घडलो. हे सगळे अनुभव, नवीन जग, गोष्ट सांगण्याची प्रत्येक वेळेला नवीन पद्धत शोधणं, गोष्टीच्या, पात्रांच्या त्यांच्या भावनांच्या खोलात शिरुन प्रेक्षकांना खरेपणाचा अस्सल अनुभव देण्यासाठी ‘झी मराठी’ नेहमीच झगडते. तसे आम्ही सुद्धा झगडलो. ही सगळी माणसं माझ्या नुसती आयुष्यात आली नाहीत तर आयुष्याचा भाग बनली. शेवटी आठवणी माणसंच तयार करतात. या दीड वर्षातल्या काही आठवणी पण झी मधल्या प्रत्येक डिपार्टमेंट मधल्या प्रत्येकाला Thank you so much… आणि Fiction Team तुम्हाला विशेष Thanks. तुम्ही सुद्धा तुमचा बॉस म्हणून मला अगदी सहज स्वीकारलं. खूप Miss करेन सगळ्यांना. आत्ता प्रत्येक What’s App group मधून बाहेर पडताना काही सेकंद हात जड झाले. डोळ्यात पाणी आलच. आपण टीम म्हणून एकत्र केलेलं काम, मजा , मस्करी, किस्से, सगळं खूप miss करेन. कधी कोणाला दुखावलं असेन तर sorry आणि या संपूर्ण गोड अनुभवासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. मला खात्री आहे. लवकरच ‘झी मराठी’चे जुने दिवस. तो अभिमान सगळं परत येईल. All the best आणि मी मराठी झी मराठी’, असं लिहित त्याने या पदावरुन अधिकृतरित्या जबाबदारीतून मुक्त झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Adwait Dadarkar (@adwaitdadarkarofficial)

आणखी वाचा – “भाड्याच्या घरात राहत होतो पण…”, शर्मिष्ठा राऊतची गणपती बाप्पाने पूर्ण केली ‘ती’ इच्छा, म्हणाली, “गेल्यावर्षी आम्ही…”

या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्याच्या कामाचं कौतुक करत पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी लिहीतो, ‘ज्या काही चांगल्या गोष्टी आल्या असतील त्यात तुमचा वाटा आहे’ तर दुसरा नेटकरी लिहीतो, ‘तुम्ही खूप great आहात सर’ असं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.

Tags: adwait dadarkarmarathi actorzee marathi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
Swanandi Tikekar Making Modak

Video : "मोदकाचा मोमो झाला",स्वानंदी टिकेकरला बनवता येईना मोदक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात, "हे काय केल तू?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.