गणेश चतुर्थीनिमित्त आज सर्वत्र लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत होत आहे. सामान्य नागरिकांप्रमाणे कलाकार मंडळींच्या घरीही बाप्पाचे जल्लोषात आगमन होत आहे. मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी तिने बाप्पाच्या आगमनासाठी एक सुंदर असे मखर बनविले असून या सजावटीत तिला तिच्या घरातील मंडळींची साथ मिळाली आहे. (Tejashri Pradhan making Makhar for Ganeshotsav)
अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमधून तीन वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं असून तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मालिकेतील तिच्या भूमिकेलाही उदंड प्रेम मिळत असून पहिल्याच आठवड्यात मालिकेने टीआरपीमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. अन्य कलाकारांप्रमाणे दरवर्षी तेजश्रीच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन होत असून यंदाच्या गणेशोत्सवासाठी तिने खास तयारी केली आहे. तेजश्रीने तिच्या घरातील मंडळींसह गणपती बाप्पासाठी मखर तयार केलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – Video : निवेदिता सराफ यांनी बनवले ‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवरच मोदक, व्हिडिओ व्हायरल
तेजश्री प्रधानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मखर बनवताना दिसत असून तिच्या या कामामध्ये तिचे बाबा, आजोबा, चुलत भाऊ-बहीण व अन्य मंडळी मदत करताना दिसत आहे. कोणी लाकडाच्या पट्ट्यांना रंग देतंय, तर कोणी पुट्ठे कापत आहे. कोणी पानांची जुळवाजुळव करत आहे, तर कोणी लाईट्स व अन्य सजावट करत आहे. या सजावटीत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून प्रत्येकाचा उत्साह पाहण्यासारखा आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तेजश्रीने बाप्पाच्या स्वागतासाठी आम्ही सर्व सज्ज असल्याचे म्हटले आहे.
हे देखील वाचा – Video : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या घरी झाले गणरायाचे आगमन, मूर्तीभोवती फुलांच्या सुंदर आरासने वेधले लक्ष
तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने म्हटलंय, “यातच खरी मजा आहे गणेशोत्सवाची…”, तर आणखी एक नेटकरी म्हणतोय, “गणपती बाप्पा आले की उत्साह हा आपोआप संचारतोच”. तेजश्रीचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड भावला असून आता अभिनेत्रीच्या बाप्पाची झलक पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहे.