गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसरीमध्ये असताना काढलेल्या गणपतीच्या चित्राचा फोटो हेमांगीने केला शेअर, म्हणाली, “चित्रकार व्हायचं ठरवलेलं पण…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 19, 2023 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hemangi Kavi share a old Photo

दुसरीमध्ये असताना काढलेल्या गणपतीच्या चित्राचा फोटो हेमांगीने केला शेअर, म्हणाली, “चित्रकार व्हायचं ठरवलेलं पण...”

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून अनेकांच्या घरी आज लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणेशोत्सवानिमित सर्वत्र एक उत्साह पाहायला मिळत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. अनेक कलाकारांच्या घरीही लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून सर्वांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. (Hemangi Kavi share a old Photo)

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सतत तिच्या खासगी आयुष्याविषयीची काही क्षण तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. याशिवाय ती सोशल मीडियावर कोणत्याही मुद्द्यावर नेहमीच व्यक्त होताना दिसते. अशातच हेमांगीने गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकतंच एक फोटो शेअर केला असून तिने या पोस्टमधून बालपणीची आठवण तिच्या चाहत्यांसमोर शेअर केली आहे.

हेमांगीने गणेशोत्सवावेळी तिच्या लहानपणी काढलेलं गणरायाचं चित्र शेअर केला आहे. ते शेअर करताना तिने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती या पोस्टमध्ये म्हणाली की, “मी दुसरीत असताना एका चित्रकला स्पर्धेत काढलेलं गणपती बाप्पाचं चित्र! यासाठी मला बक्षीस मिळालं होतं. आयुष्यातलं पहिलं बक्षीस! परीक्षकांनी या चित्राला बक्षीस देण्याचं कारण सांगताना ते म्हणाले, चित्र म्हणून हे तेवढं छान नसलं तरी चित्रकलेला लागणारी निरीक्षण शक्ती अफाट आहे. एखाद्याने नुसतंच गणपतीचं चित्र काढलं असतं पण हिने भटजी बुवा, मागे तंबोरा घेऊन बसलेली मुलगी (ती माझी ताई आहे कारण ती गाण्याच्या क्लासला जायची आणि गणपतीत ती तिच्या सरांना साथ द्यायची), तबला वाजवणारा मुलगा (ताईच्या क्लासमधला), उंदीरमामा, अगरबत्ती, नेवैद्य, मोदक या सर्व गोष्टींसाठी बक्षीस देतोय.”

हे देखील वाचा – तेजश्री प्रधानने कुटुंबासह बनवला बाप्पासाठी खास मखर, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी म्हणतात, “यामध्येच खरी…”

“तेव्हाच्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी शाळेत प्रत्येक वर्गात जाऊन मिळालेलं बक्षीस दाखवताना काय भारी वाटलं होतं काय सांगू! त्यांच्या या कौतुकामुळे मला प्रोत्साहन मिळालं. तेव्हाच मी चित्रकार व्हायचं ठरवून टाकलं आणि झालेही! गणपती म्हणजे कलेची देवता. पुढे याच कलेच्या देवतेने मला अभिनय क्षेत्रात आणलं आणि माझ्या अभिनय क्षेत्रातला श्रीगणेशा झाला!” असे हेमांगी या पोस्टमध्ये म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हे देखील वाचा – सुबोध भावेच्या लेकांनी गणपतीसाठी बनवला ‘चांद्रयान’चा देखावा, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

पुढे ती म्हणते, “हिला एवढं लहानपणीचं कसं काय आठवतं बरं असं जर मंडळातील काही सदस्यांना वाटलं तर हो गणपतीचा वरदहस्त माझ्यावर आहे आणि हत्ती या प्रजाती सारखीच माझी ही बुद्धी चांगली आहे! म्हणून नाटकातले संवाद आम्हांला पाठ होतात!”. तिच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहे.

Tags: hemangi kavihemangi kavi new postHemangi Kavi share a old Photo
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Nikhil Bane On Ganeshotsav

गणपतीला कोकणातल्या गावी जाणं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेला अशक्य, खंत व्यक्त करत म्हणाला, "खूप वाईट वाटतं कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.