सध्या बऱ्याच मालिकांमध्ये मंगळागौरची क्रेझ असलेली पाहायला मिळतेय. श्रावण महिन्यात साजरी करण्यात येणारी मंगळागौर ही सर्वत्र जोरदार साजरी केली जाते. मालिकांमध्ये सध्या ही मंगळागौर अधिक प्रमाणात साजरी केली जाते, तसेच कलाकार मंडळीही त्यांच्या खऱ्या आयुष्यात ही मंगळागौर साजरी करताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकार मंडळींनी मोठ्या प्रमाणात ही मंगळागौर साजरी केली असून त्याचे अनेक फोटोस ते सोशल मीडियावरून शेअर देखील करत असतात. अशातच मराठमोळ्या अन प्रेक्षकांच्या लाडक्या जोडीनेही जोरदार पणे ही मंगळागौर साजरी केली आहे. (Akshaya And Hardeek Joshi)
मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. ऑनस्क्रीन या जोडीने जेवढं लोकांचं प्रेम मिळवलं तितकाच ऑफस्क्रिनही चाहते या जोडीवर भरभरून प्रेम करत आहेत.मालिका संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसातच साखरपुडा उरकला. २०२२ वर्षाच्या शेवटी दोघे विवाहबंधनात अडकले.
त्यांनतर अक्षयाची लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर धुमधडाक्यात साजरी करण्यात आली, त्यानिमित्त हार्दिकच्या घरी जोरदार तयारी केली गेली होती. याचा व्हिडिओ अक्षया व हार्दिकने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. अक्षयाच्या मंगळागौरीचा आणखी एक लक्षवेधी व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
मंगळागौर निमित्त खेळले जाणारे खेळ अक्षयाने खेळले असून हार्दिकने ही तिच्यासोबत ठेका धरलेला पाहायला मिळतोय. अक्षयाची मंगळागौर ही अक्षया सोबत हार्दिकने ही एन्जॉय केलेली पाहायला मिळतेय. मंगळागौरनिमित्त अक्षया व हार्दिक ही जोडी पारंपारीक पेहरावात पाहायला मिळाली. या पारंपरिक पेहरावातच या जोडीने ठेका धरला.
अक्षयाने सोशल मीडियावर शेअर केलेले हे मंगळागौरचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही पूजा करताना दिसत आहेत. सजावटीत मागे शंकराच्या पिंडीची प्रतिमा दिसत असून त्याला मंदिराचं स्वरूप दिलं आहे. सोबतच त्यांचा मंगळागौरचे एकत्र खेळ खेळतानाचा व्हिडीओ चाहत्यांच्या अधिक पसंतीस पडला आहे.