Jitendra Joshi On Sanjay Mone: गोदावरी चित्रपटाला ६९वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला त्यामुळे सर्वच स्तरातून संपूर्ण टीमच कौतुक केलं जात आहे. लोकप्रिय मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी अभिनित गोदावरी चित्रपट आहे, त्यामुळे जितेंद्रच ही कौतुक केलं जात आहे. अशातच अभिनेता जितेंद्र जोशी याने अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यांत जितेंद्र आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तीबद्दल बोलताना दिसतोय. ती व्यक्ती आहे अभिनेते संजय मोने.(Jitendra Joshi On Sanjay Mone)
जितेंद्र जोशी कायमच त्याच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिला. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवण्यात येतो ज्यात संजय मोने हे जितेंद्रवर नाराज असलेले दिसून येतात. कारण जितेंद्र त्यांचा वाढदिवस विसरला होता. जितेंद्रच्या हे खूप उशिरा लक्षात आलं आणि त्याने नंतर त्यांना फोनही केला. तरीही संजय हे त्याच्यावर नाराज असलेले व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.
पाहा काय म्हणाला जितेंद्र जोशी? (Jitendra Joshi On Sanjay Mone)
यावर जितेंद्र बोलताना म्हणतो, “अख्खं जग रुसेल पण काका नाही रुसणार. एवढं नातं घट्ट आहे. काका माझ्यावर कधीही नाराज होऊ शकत नाहीत. माझा बाप आहे तो. माझ्या अपघातानंतर त्याने मला उभं केलंय रे. त्या घटनेनंतर त्याने मला मी हिरो असल्याची जाणीव करून दिली. मी हिरो आहे हे त्याने माझ्यात रुजवलं. त्याच्यामुळे मी पुन्हा पाय घट्ट रोवून उभा राहिलोय.”

हे देखील वाचा: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी जपलं सामाजिक भान, अंधश्रद्धा निर्मुलनावर प्रबोधन, सोशल मीडियावर होतंय कौतुक
जितेंद्र संजय मोने यांच्याबद्दल भरभरून बोलत असतो तेव्हा संजय मोने मागून येतात आणि त्यांना पाहताच जितेंद्र भावुक होतो आणि त्यांना मिठी मारतो व त्यांच्या पाया पडतो. त्यांचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.