69th National Film Awards : ६९व्या राष्ट्रीय पुरस्कार कोण पटकावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांसह मराठी चित्रपटांनीही आपला झेंडा रोवला आहे. ‘एकदा काय झालं’, ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. तर हिंदीमध्ये ‘गंगुबाई’, ‘सरदार उधम’ चित्रपटाने चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कोणत्या चित्रपटांनी यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला? याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे…
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी – आरआरआर (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – आरआरआर (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा १
सर्वोत्कृष्ट एडिटर – गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी), क्रिती सेनॉन (मीमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुष्पा (अल्लू अर्जून)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’