सिनेसृष्टीतल्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान कलाकार मंडळीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असतात. लग्न समारंभ असो वा बारसं असो, किंवा कोणीतरी गुडन्यूज शेअर करणारं असो, प्रत्येक आनंदाची दुःखाची बातमी हे कलाकार मंडळी सोशल मीडियावरून शेअर करून व्यक्त होतात. अशातच काही दिवसांपासून सई लोकूरने दिलेल्या आनंदाच्या बातमीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सई लोकूर लग्नाच्या तीन वर्षांनी आई होणार असून ही गोड बातमी तिने सोशल मीडियावरून शेअर करून दिली आहे. (Sai Lokur Troll)
सध्या ही कलाकार मंडळी फोटोशूट वा व्हिडीओ शूट करून प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील आनंदाची बातमी शेअर करत असतात. अशातच सईने आई होणार असल्याची गोड बातमी तिने फोटोशूट करून शेअर केली. सईचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. सईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटो आणि त्या फोटोंवरील कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि याचं गोष्टीची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
सईनं मॅटर्निटी फोटोशूटचे बरेच फोटो शेअर केले असून एका फोटोखाली तिने ‘बेबी रॉय इज कमींग’ असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी या फोटोवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर सईनं एका फोटोत पोज देताना हातात छोटे बुट पकडले आहेत, ते देखील मुलाचेच आहेत. आणि तिनं घातलेला ड्रेसही निळ्या रंगाचा असल्यानं नेटकऱ्यांनी वेगवेगळे अंदाज लावून सईला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. “तुला कसं समजलं की बेबी बॉय होणार आहे”?, असा प्रश्न एका युझरनं विचारला आहे.
“आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आमचं कुटुंब आता पूर्ण होणार आहे” असं म्हणत सईने फोटो शेअर करत आई होणार असलायची गोड बातमी दिली. सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रेग्नंसी टेस्ट स्ट्रीप दाखवताना दिसत होती. त्यानंतर सई व तिच्या पतीचे अनेक फोटो सोशल मीडियावर तिने पोस्ट केले आहेत.