देशभरात साथीचे आजार सर्वत्र पसरत आहेत. हिवताप, डेंग्यू, मलेरिया अश्या साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने सर्वत्र हा चिंतेचा विषय बनला आहे. अशातच अनेक बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटांत झळकलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानला नुकतीच डेंग्यूची लागण झाली आहे. तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ही माहिती देताना तिच्या चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (bollywood actress zareen khan)
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री झरीन खानला ताप व अंगदुखीचा त्रास होत आहे. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता, झरीनला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा – स्मृती इराणींनी मैत्रिणीच्याच पतीशी केलं लग्न?, बऱ्याच वर्षांनी सांगितलं सत्य, म्हणाल्या, “माझा अपमान…”
याची माहिती देताना झरीनने सोशल मीडियावर रुग्णालयातील काही फोटोज शेअर केले आहेत. ज्यात ती यातून बरी होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शिवाय या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राबवण्याचे तिने सांगितले.
हे देखील वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर गरोदर, नवऱ्याला लिप किस करत दिली आनंदाची बातमी, अभिनेत्रीचा बदलला लूक

अभिनेत्री झरीन खानने सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हेट स्टोरी ३’, ‘वजाह तुम हो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. तिने पंजाबी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले. (bollywood actress zareen khan infected with dengue)