सध्या सर्वत्र ‘ताली’ या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तृतीयपंथी यांवर आधारित ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये अनेक मराठी कलाकारांची वर्णी पाहायला मिळाली. अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ‘ताली’ या वेबसीरीजमध्ये सुव्रतने तृतीयपंथीची भूमिका साकारली आहे. अभिनेता सुव्रत जोशीच्या या वेबसीरिजमधील भूमिकेचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळतंय. सोशल मीडियावरही सुव्रतच्या भूमिकेचं कौतुक होताना दिसतंय. अशातच सुव्रतच त्याची पत्नी अभिनेत्री सखी गोखलेने देखील कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर नवऱ्याचं कौतुक करणारी एक स्पेशल पोस्ट तिने शेअर केली आहे. (Sakhi Gokhale On Suvrat Joshi)
सखीने सुव्रतचं कौतुक करत म्हटलं आहे की. “सू मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू खूप सुंदर परफॉर्मन्स दिला आहेस. तुझ्याबरोबर राहूनसुद्धा तू या भूमिकेसाठी तयारी कधी केलीस हे माझ्यासाठी पडलेलं एक कोड आहे. तुझ्या अभिनयातून तू दाखवलेली संवेदनशीलता आणि आजवर दुर्लक्षित राहिलेल्या वारंवार अपमानित झालेलं जेंडर साकारण्यासाठी लागणारा समतोल साकारण्यासाठी तू खूप प्रयत्न केले आहेस हे दिसून येत आहे”.

“तू कायम स्वत:ला अशी आव्हान देत राहा आणि तुझ्या भवतीची बंधन तोडत रहा. आय लव्ह यू. तू मला आज प्रेरणा दिलीस स्वत:च्या कलेत अजून नैपुण्य मिळवण्यासाठी आणि स्वत:च्या कलेशी एकनिष्ठ राहण्याची. याबरोबरच सखीने या वेबसीरीजचे लेखक क्षितीज पटवर्धन आणि दिग्दर्शक रवी जाधव अभिनेत्री सुष्मिता सेन यांचही पोस्टमधून कौतुक केलं.
‘ताली’ ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये गौरी सावंत यांची भूमिका अभिनेत्री सुश्मिता सेन हिने उत्तमरीत्या साकारली आहे. १५ ऑगस्टरोजी प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजमध्ये अनेक मराठमोळे कलाकार पाहायला मिळाले. आणि त्यांचं सर्वत्र कौतुकही होताना पाहायला मिळतंय.