मनोरंजन सृष्टीत कलाकारांना ट्रोलिंगचा प्रकार हा काही नवीन नाही. अनेक कलाकार मंडळी हमखास नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकतात आणि त्यांना ट्रोलर्सला उत्तर ही द्यावी लागतात. काही कलाकार मंडळी अशी असतात जी ट्रोलर्सला उत्तर देणं टाळतात, वा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र काही कलाकार मंडळी अशीही आहेत जी न घाबरता सडेतोड उत्तर देतात. असाच ट्रोलिंगचा अनुभव अभिनेत्री पूजा सावंतला देखील आला आहे. याबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने भाष्य केलं. (Pooja Sawant Answer to Trollers)
नुकतीच पूजा सावंतने भार्गवी चिर्मुलेच्या ‘गप्पा, मस्ती’ या पॉडकास्टला हजेरी लावली होती. त्यावेळी तिथे तिने अनेक मुद्दे मांडले. यांत जेव्हा तिला दैनंदिन आयुष्यात एक कलाकार म्हणून ट्रोलिंगचा सामना कसा करतेस? असा प्रश्न विचारला असता, पूजा स्पष्टच बोलली की, “ट्रोलर्सनी ट्रोल कलाकारांना ट्रोल करावे. आपण लोकशाहीत राहत असल्याने याबद्दल त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण, स्वत:ची लायकी सोडून एखाद्याला ट्रोल करणे चुकीचे आहे, तुम्हाला काहीच अधिकार नाही.” पूजाच्या या बोलण्यावरून तिचा संताप स्पष्टपणे दिसला.
पाहा ट्रोलर्सला उत्तर देत काय म्हणाली पूजा सावंत (Pooja Sawant Answer to Trollers)
यापुढे बोलताना पूजा म्हणाली की, “एखाद्या कलाकाराला सभ्य भाषेत ट्रोल करता येऊ शकते. पण, आजकाल वाचता येणार नाही अशा आक्षेपार्ह कमेंट्स केल्या जातात. अशा या किळसवाण्या ट्रोलर्सचे मी कधीच समर्थन करणार नाही. मला अनेकदा त्या कमेंट्स वाचून खूप वाईट वाटते. मी त्या आक्षेपार्ह कमेंट्स डिलीट करते किंवा त्या युजरला ब्लॉक करते. माझ्या आयुष्यात मला नकारात्मकता नको आहे”.

“अलीकडेच मी भगवान शंकराच्या मंदिरात जातानाचा व्हिडीओ शेअर केला होता. मी साडी, टिकली, गजरा व्यवस्थित गेले होते. तेव्हा माझ्या गळ्यात काहीच घातलेले नसल्याने ‘मॅडम गळ्यात काहीतरी घाला, ही आपली भारतीय संस्कृती आहे. ‘ अशा कमेंट्स करण्यात आल्या होत्या.”
तसेच नकारात्मकतेचा विचार सोडून आता सकारत्मकता तिच्याजवळ कशी येईल याचाही ती सतत विचार करत असते, अशी पूजा म्हणाली.