Konkona sen on Ramayan Mahabharat : अभिनेत्री व दिग्दर्शिका कोंकणा सेन काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘कुत्ते’ या चित्रपटात दिसली, तसेच लवकरच ती मनोज बाजपेयी यांच्यासोबत आगामी ‘सूप’ या वेबसीरिजमध्ये देखील झळकणार आहे. ‘लस्ट स्टोरीज २’ या गाजलेल्या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुराही कोंकणा सेनने सांभाळली. अभिनेत्रीसह दिग्दर्शक म्हणून ही कोंकणाने आपलं नाव सिनेसृष्टीत कमावलं आहे. दरम्यान कोंकणाने नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या भाष्यावरून साऱ्यांनाच धक्का बसला आहे. लहानपणी तिला रामायण व महाभारत पाहण्यास घरून बंदी असल्याचा खुलासा खुद्द कोंकणाने केला, असल्याचं समोर आलं आहे.
‘फिल्म कम्पॅनियन’सोबत झालेल्या मुलाखतीत कोंकणा म्हणाली, तिच्या सुरुवातीच्या काळात तिची आई अपर्णा सेनने तिला हिंदी आणि बंगाली सिनेमे पाहण्यास नकार दिला. तिला ‘द बोल्ड अँड द ब्युटीफुल’ किंवा ‘सांता बार्बरा’ तसेच रामायण व महाभारत सारखे भारतीय महाकाव्ये पाहण्याची ही परवानगी नव्हती.
पण, त्याला कारण होत म्हणत कोंकणा म्हणाली, “मला रामायण व महाभारतही पाहण्याची परवानगी नव्हती. तिने आग्रह धरला की मी प्रथम ती महाकाव्ये वाचावीत आणि मग ती मी पाहावीत. ती म्हणायची की, या महाकाव्यांचे पहिले प्रदर्शन इतर कोणाच्या कल्पनेत नसावे, ते तुमच्या स्वतःच्या कल्पनेचे असावे”. “मी एक आज्ञाधारक मुलगी असल्याने मी माझ्या आईचा शब्द कधीही मोडला नाही”, असंही कोंकणा म्हणाली.
कोंकणाने असेही सांगितले की, ‘ती लहान असतानाही तिची आई तिच्याशी प्रौढांप्रमाणे वागायची’. ती म्हणाली, “मी फक्त लहान मुलगी होती. ज्याप्रकारे तिने माझे पालनपोषण केले त्यात मला नेहमीच माझी स्वतःची जागा दिली गेली. त्यामुळे, मला वाटते, मला या गोष्टीची खूप मदत झाली”.