Kranti Redkar Sameer Wankhede Love Story: कलाक्षेत्रातल्या अनेक जोड्या या कायम चर्चेत असतात. परंतु अनेक कलाकारांचे जोडीदार हे वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात. आपल्या लाडक्या कलाकारांचे जोडीदार कोणत्या क्षेत्रात आहेत हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना कायमचं आवडत. परंतु अशीच दोन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जोडी म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर व सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची. ही जोडी देखील अनेकदा चर्चेत असते. (Kranti Redkar Sameer Wankhede Love Story)
अभिनेत्री क्रांती रेडकर जितकी चर्चेत असते तितकेच समीर वानखडे देखील त्यांच्या बिनधास्त व बेधडधक कामामुळे विशेष चर्चेत असतात.कलाक्षेत्राशी समीर यांचा देखील संबंध येत असतो, आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्या नंतर समीर वानखेडे सातत्याने चर्चत आहे.परंतु दोन भिन्न क्षेत्रात काम करणारे क्रांती व समीर भेटले कुठे? यांसारखे अनेक प्रश्न प्रेक्षांच्या मनात आहेत. प्रेक्षकांच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर स्वतः समीर वानखेडे यांनीच दिले आहे.
जाणून घ्या क्रांती रेडकर व समीर वानखेडे यांची प्रेमकहाणी (Kranti Redkar Sameer Wankhede Love Story)
समीर वानखेडेंनी नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात हजेरी लावली होती.तेव्हा अवधूत गुप्तेंनी समीर यांना सरकारी नोकरीत असणारे त्यांच्याच क्षेत्रात सोयरिक करतात. मग तुम्ही क्रांतीला कुठे शोधलं? असा प्रश्न विचारला. त्यावर समीर यांनी सांगितलं की क्रांती व समीर यांचा प्रेमविवाह आहे, लोकांना माहीत नाही की ती माझी जुनी मैत्रीण आहे. आम्ही रुईया कॉलेजमध्ये एकत्र होतो. तेव्हापासून मी तिला आवडायचो, नंतर आम्ही लग्न केलं,” असं समीर यांनी सांगितलं. ‘तुम्ही कॉलेजमध्ये तिला प्रपोज केलं नाही का?’ असं विचारलं असता समीर म्हणाले, “नाही, इगो इश्यूज असतात ना, त्यामुळे मी अप्रोच केलं नाही. पण मलाही ती आवडायची. मग तिनेच मला विचारलं. मलाही तिच्याशी लग्न करायचं होतं.”

हे देखील वाचा : “गुन्हेगार टॉयलेट करताना त्यांच्यासमोर उभा राहतो कारण…” समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, म्हणाले, “चार ते पाच दिवस…”
तसेच समीर व क्रांती यांना दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती बऱ्याचदा तिच्या मुलींचे मजेशीर किस्से तिच्या सोशल मीडियावरून शेअर करत असते. समीर यांच्या कामाचं स्वरूप पाहता बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबाला अनेक धमक्यांना सामोरं जावं लागतं.