स्टार प्रवाह वाहिनी वरील नंबर वन मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. या मालिकेने अगदीच कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील सगळेच पात्र त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. अर्जुन , सायली , अन्नपूर्णा आजी खलनायिकेच्या भूमिकेतील प्रिया, साक्षी मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेत अनेकदा नवनवीन वळणं येत असतात बरेचदा मालिकेतील पात्र रिप्लेस देखील होतात. ( Tharal Tar Mag Update)
‘ठरलं तर मग’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असणारी ‘साक्षी’ म्हणजेच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मिरा जगन्नाथनंने मालिका सोडल्याचं समोर आलं आहे.मीरानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, तिच्या या अचानक एक्झिटमुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत. मिराने ‘साक्षी’ हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मीरा ही सोशलमीडियावर देखील तितकीच सक्रिय असते.
पाहा – ‘ठरलं तर मग’ या मालिकेत साक्षीच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री ( Tharal Tar Mag Update)

मालिकेत मीरा जगन्नाथच्या जागी आता अभिनेत्री केतकी पालव झळकली आहे. याआधी केतकीनं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ती ‘आमने सामने’ या नाटकातही दिसली आहे. तर आता साक्षीची भूमिका केतकी साकारणार असून केतकी तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करेल.
नुकतेच मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले. त्यानिमित्त मालिकेतील सर्व कलाकारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. या मालिकेच्या सर्व टीमचं पडद्यामागे देखील कमाल बॉण्डिंग पाहायला मिळतं. सुरुवातीपासून मालिकेत सातत्याने येणाऱ्या रंजक वळणांमुळे प्रेक्षक मालिकेशी जोडले गेले. आणि आजही मालिकेला तितकाच उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे.
हे देखील वाचा – सासरच्या मंडळींबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने बोलली स्पृहा जोशी, म्हणाली, “सासू-सासऱ्यांनी माझ्याकडून …”
मालिकेत सायली ही वाईट सून आहे असं चित्र पूर्णा आजीच्या डोळ्यांसमोर उभं करण्यासाठी अर्जुनची धडपड चालू आहे. यासाठी अर्जुनने प्रियाचा वापर केला. पूर्णा आजीच्या मनात सायली बद्दल वाईट पेरण्यात अर्जुन यशस्वी झालाय. मात्र अर्जुन आणि सायली यांचं खरं नातं सगळ्यांसमोर आल्यावर मालिकेत पुढे काय होणार ? सायली हीच खरी तन्वी आहे हे कधी उघडकीस येणार हे पाहण रंजक ठरणार आहे.