Pravin Tarde in SS Rajamouli Film : अनेक कलाकार आपल्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध असतात कोणी अभिनयासाठी कोणी लिखाणासाठी तर कोणी दिग्दर्शनासाठी. या महत्वाच्या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला अभिनय, लिखाण, दिग्दर्शन या तिन्ही गोष्टींमध्ये निपुण असणारा प्रवीण तरडे. प्रवीण तरडे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शन केलेला ‘धर्मवीर- मुक्काम पोश्ट ठाणे’ हा चारपट कमालीचा गाजला .त्यानंतर स्वतः प्रवीण तरडे यांनी साकारलेले स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मराठी चित्रपटात आपली छाप उमटवल्यानंतर आता प्रवीण तरडे सज्ज झाले आहेत साऊथ चित्रपटांमधील भूमिकांसाठी. लवकरच ते प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली.
नुकत्याच बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत दाक्षिणात्य चित्रपटातील भूमिकेविषयी प्रवीण तरडे यांनी खुलासा केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील दिग्दर्शन क्षेत्रातील एक प्रमुख नाव म्हणजे दिग्दर्शक एसएस राजामौली. ‘आर आर आर’, ‘बाहुबली’, ‘बाहुबली २’ यांसारख्या जागतिक विक्रम रचणाऱ्या चित्रपटांचं दिग्दर्शन राजामौली यांनी केलं आहे. प्रवीण तरडे लवकरच एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपटात प्रमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबद्दल सांगताना प्रवीण तरडे म्हणाले “एसएस राजामौली हे माझे आधीपासून दिग्दर्शनातील आदर्श आहेत. माझ्या ऑफिसमध्ये, घरामध्ये महेश मांजरेकर आणि एसएस राजामौली यांचे फोटो आहेत. धर्मवीरच्या प्रमोशन निम्मित त्यांना भेटण्याचा योग्य आला होता. त्यावेळी त्यांना भेटून मी खूप भारावलो होतो. त्यांना मी माझ्या घरात तुमचा फोटो आहे तुम्ही माझे आदर्श आहेत हे देखील सांगितलं.”(Pravin Tarde south indian movies)

दरम्यान या संबंधित आणखी माहिती देत पुढे प्रवीण तरडे म्हणाले “जेव्हा राजामौली सरांनी पहिल्यांदा मला पाहिलं तेव्हा म्हणाले तुमचा लूक तेलगू चित्रपटांना साजेसा. २०, २२ वर्षे त्यांना भेटणाची स्वप्न पाहणारा मी आज राजामौली यांच्यासह काम करतोय याचा खूप आनंद आहे. मी राजामौली यांच्या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारतोय. राजामौली हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. लवकरच ते पत्रकार परिषद घेऊन चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा करतील.”(ss rajamouli upcoming movies)
हे देखील वाचा – सचिन तेंडुलकरने व्हिडिओ कॉलद्वारे केलं दीपा परबचं कौतुक,पोस्ट शेअर करत दीपा म्हणाली “चित्रपटाने भरपूर काही दिलंय पण….”
प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांचं लेखन, दिग्दर्शन केलं आहे. मुळशी पॅटर्न,देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव या, बलोच अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रवीण तरडे यांनी यशस्वी भूमिका निभावल्या आहेत. त्याशिवाय प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘धर्मवीर’ या चित्रपाटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला.