७० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या जोरदार चर्चेत आहेत. याचे कारण आहे ते नुकतंच प्रदर्शित झालेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटात त्यांचा व अभिनेत्री शबाना आझमी यांचा गाजलेला किसिंग सीन.
दिग्दर्शक करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतले असून त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद तर मिळालाच, शिवाय त्यांचा आणि शबाना आझमी यांच्यातील किसिंग सीनमुळे सगळीकडे हा चर्चेचा विषय बनला आहे. अशातच धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर त्यांचा मुलगा व अभिनेता सनी देओल याने मोठं वक्तव्य केलं आहे. (Sunny Deol on Dharmendra Kissing Scene)
अभिनेता सनी देओल याबद्दल बोलताना म्हणाला, “माझे वडील काहीही करु शकतात. मी तर म्हणेन की ते एकमेव अभिनेते आहेतच, जे या वयात असं करू शकतात. मी अद्याप वडिलांचा सिनेमा पाहिलेला नाही. मी जास्त सिनेमे पाहत नाही. एवढंच काय तर माझे अनेक सिनेमे देखील मी पाहिले नाहीत. त्यामुळे मी यावर माझ्या वडिलांशी कसं बोलणार ? ते एक असे व्यक्तिमत्त्व आहे, जे त्यांच्या नम्रता आणि प्रामाणिकपणामुळे सर्व काही कॅरी करू शकतात.” (Sunny Deol on Dharmendra Kissing Scene)

हे देखील वाचा – ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये या दिग्गज नटांचा इंटिमेट सीन पाहून प्रेक्षकांना बसला धक्का
अभिनेता सनी देओलचा २००१ मध्ये आलेला ‘गदर’चा सिक्वेल ‘गदर २’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. येत्या ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार असून तब्बल २२ वर्षांनंतर तारा सिंगचा ॲक्शनपॅक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.