शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Happy Birthday Genelia Dsouza : बायकोवर जीवापाड प्रेम करतो रितेश देशमुख, जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त म्हणाला, “माझी बायको…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 5, 2023 | 3:54 pm
in Trending
Reading Time: 4 mins read
google-news
Riteish Deshmukh Special post

Riteish Deshmukh Special post

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीच्या यादीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची नाव अग्रस्थानी आहेत. रितेश आणि जिनिलीयाची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना विशेष भावते. सिनेसृष्टीत रितेश आणि जिनिलीयाच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यांच्यावरील संस्कारांचे प्रत्येकवेळी सर्वत्र कौतुक होते. रितेश आणि जिनिलीयाने बऱ्याच कालावधींनंतर सिनेसृष्टीत मोठ्या उत्साहाने कमबॅक केलं. आणि त्यांच्या या ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली. (Riteish Deshmukh Special post)

या चित्रपटातील रितेश व जिनिलीयाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली. ही जोडी केवळ पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही कायम बहरलेली पाहायला मिळते. १० वर्ष होऊनही रितेश जिनिलीया यांच्यातील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. आज जिनिलीयाचा वाढदिवस आहे, आणि तिच्या वाढदिवसानिमित्त रितेशने सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर केली आहे.

पाहा रितेशची पत्नीसाठीची खास पोस्ट (Riteish Deshmukh Special post)

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आज जिनिलीयाचा ३६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रितेशने इंस्टग्राम अकाउंटवरून जिनिलीयासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यांत त्याने दोंघांचा एकत्र फोटो शेअर केला आहे, आणि म्हटलं आहे की, “माझी जिवलग मैत्रीण, माझी कठोर टीकाकार, माझी कट्टर समर्थक, माझी गुन्ह्यातील भागीदार, माझी सर्वात मोठी चीअरलीडर, माझी जीवनरेखा, माझे सर्व काही, अशा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे जीवन समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद, माझ्या सोबत कायम आहेस म्हणून धन्यवाद.. माझी बायको. माझे वेड!!! मी तुझ्यावर प्रेम करतो. अशा रोमँटिक आशयाची पोस्ट त्याने लिहिली आहे.

हे देखील वाचा – जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही जिनिलीया देशमुख, म्हणालेली, “तेल न वापरता मी…”

त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत जिनिलीयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिनिलीयाने जवळपास १० वर्ष चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला होता. घर, संसार, मुलं सांभाळण्यात ती रमली होती. मात्र तिने तिच्या इच्छेनुसार हा पर्याय निवडला होता. कामाबरोबरच तिने तिच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. जिनिलीयाची हिच खासियत सगळ्यांना आवडते. इतकंच नव्हे तर जिनिलीया मराठी संस्कृतीही जपते.

Tags: Genelia D'Souza Birthdaygenelia deshmukhgeneliya dsouzariteish deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Marathi actor pushkar shrotri share funny video

“असे फालतू जोक...” ‘त्या’ व्यक्तीच्या पार्श्वभागाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला चाहतीने सुनावलं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.