‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या छोट्या पडद्यावरील मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या मालिकेची लोकप्रियता संपूर्ण जगभरात पसरली आहे. मालिकेचं विनोदी तसेच आशयघन कथानक प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास भाग पाडतंय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अशातच या मालिकेतील बबिता ही भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारतेय. बबिता या भूमिकेमुळे अभिनेत्री मुनमुन दत्ता प्रसिद्धीझोतात आली. (Munmun Datta Troll)
सध्या मुनमुन दुबई येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यात व्यस्त आहे. ती तिच्या आईसोबत या ट्रिपला गेली आहे, दुबई येथून ती तिचे अनके हटके फोटो शेअर करत आहे.दरम्यान तिने अबू धाबीमधील मशिदीबाहेर काही फोटो काढले आहेत, जे फोटो तिला महागात पडले आहेत. नेटकऱ्यानी हे फोटो पाहता तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. “हिंदू आहात, मंदिरात जा, मशिदीत नाही,” असं म्हणत त्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
पाहा बबिताला नेटकऱ्यांनी ट्रोल करत काय म्हटलं (Munmun Datta Troll)
मुनमुन दत्ताच्या या पोस्टवर कमेंट करत एकाने म्हटलं आहे की, ‘मशिदीत जाताय, हिंदू मंदिराची कमतरता आहे का?’ दुसऱ्याने लिहिले, ‘हिंदू आहात, मंदिरात जा, मशिदीत नाही.’ तर या पोस्टखाली बरेच लोक “जय श्री राम” लिहित आहेत. तसेच, मुनमुन दत्ताला अनफॉलो करण्यास सांगत आहेत.
दरम्यान याआधीच मुनमुनने ‘मला हिंदू असल्याचा अभिमान आहे’ असे कॅप्शनमध्ये लिहिले होते. प्रेक्षकांनी आपले विचार मांडण्याआधीच तिने असं लिहिलं होतं. पोस्ट खाली कॅप्शन देत तिने म्हटलंय, “कोणीही काहीही विचारण्यापूर्वी किंवा काहीही मूर्खपणाचे गृहित धरण्यापूर्वी… मी अभिमानास्पद हिंदू आहे आणि मी दुसर्या देशाला आणि संस्कृतीला भेट देत असल्यास, मी त्यांचा आदर करण्याचा प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे, मी इतर धर्माच्या कोणत्याही व्यक्तीने माझ्याही धर्माचा आणि श्रद्धांचा आदर करावा अशी अपेक्षा करते.”
मुनमुन दत्ताला फोटो शेअर करण्याआधीच नेटकऱ्यांचा कमेंटचा, नेटकऱ्यांच्या प्रश्नांचा किंचितसा अंदाज होताच, म्हणूनच तिने आपली बाजू मांडत मशिदी बाहेरच्या फोटो सोबत कॅप्शन देखील लिहिलं.