शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का?”, आंतरजातीय लग्न करताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्या आईने…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 5, 2025 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 Hina Khan Trolled After Marriage

"तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का?", आंतरजातीय लग्न करताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, "तुझ्या आईने..."

Hina Khan Trolled After Marriage : टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिचा प्रियकर रॉकी जयस्वालशी लग्न केले आहे. ११ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर हिना खान तिच्या बॉयफ्रेंडसह लग्नबंधनात अडकली आहे. या जोडप्याने नोंदणी पद्धतीने त्यांचे लग्न नोंदवले आहे. लग्नाचे फोटो शेअर करत हिनाने चाहत्यांशी तिच्या लग्नाची बातमी शेअर केली आहे. एकीकडे, चाहते लग्नाच्या बातमीने अभिनेत्रीचे अभिनंदन करीत असताना दुसरीकडे लोक एका हिंदू मुलाशी लग्न करण्यासाठी तिला ट्रोल करीत आहेत. इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करुन हिना खानने सर्वांना आश्चर्यचकित केले.

अभिनेत्रीच्या या आनंदाच्या बातमीनंतर सिनेविश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. मुस्लिम धर्माशी संबंधित असलेल्या हिना खानने रॉकी जयस्वाल यांच्याशी नोंदणी पद्धतीने लग्न केले आहे. रॉकी हा हिंदू आहे. अशा परिस्थितीत, नेटिझन्स अभिनेत्रीच्या लग्नावर विविध प्रश्न उपस्थित करीत आहे. लग्नाच्या फोटोंवर सोशल मीडिया नेटकाऱ्याने लिहिले आहे की,”उमरे वा नमाज, काय कामाचे? जेव्हा एका हिंदूशी लग्न केलं आहेस”. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले, “तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का? कुराणात इस्लाम स्वीकारल्याशिवाय लग्न केले जाऊ शकत नाही”. दुसर्‍या नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “मुस्लिम असून हिंदूंबरोबर लग्न केलेस, तुझ्या आईने तुझ्यावर चांगले संस्कार केले नाहीत”.

आणखी वाचा – दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

View this post on Instagram

A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

या व्यतिरिक्त एका व्यक्तीने कमेंट करत म्हटलं की, “आपण हे कसे करु शकता? आपण मुस्लिम आहात आणि मला हे चांगलेच ठाऊक आहे की मुस्लिम स्त्री मुस्लिम पुरुषाशिवाय इतर कोणाशीही लग्न करु शकत नाही आणि आपण इस्लामचे नियम मोडले आहेत. अल्लाह तुम्हाला क्षमा करणार नाही”. हिना खान आणि रॉकी जयस्वाल २०१४ पासून एकमेकांना डेट करत होते. ११ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनाही जून २०२५ मध्ये लग्न केले.

आणखी वाचा – कॅन्सरशी झुंज तरीही हिना खानचा लग्न करण्याचा निर्णय, रॉकीसह गुपचूप केला विवाह, साडीवर ८ अंक कोरला कारण…

हिना गेल्या काही काळापासून कॅन्सरशी दोन हात करत आहे. तिला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कॅन्सर झाला असल्याचं समोर आलं. हिनाच्या या कठीण काळात तिला रॉकीने साथ दिली. आणि अशा परिस्थितीत रॉकीने तिच्याशी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत असताना रॉकीने घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक होत आहे.

Tags: bollywood newsentertainmenthina khan wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Vivek oberoi on bengaluru stampede

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.