शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, आईसाठी अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला, “हे नवं दुकान…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 2, 2025 | 11:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Chandekar Mother New Business

सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, आईसाठी अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला, "हे नवं दुकान…"

Siddharth Chandekar Mother New Business : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नेहमीच चर्चेत असतो. मालिका, चित्रपट यांमधून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावरही सिद्धार्थ बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. सिद्धार्थबरोबर त्याची पत्नी मिताली मयेकर व आई सीमा चांदेकर दोघीही कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. सिद्धार्थची आई सीमा सध्या सिनेविश्वात सक्रिय नसल्या तरी त्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. अशातच सिद्धार्थने त्याच्या आईसाठी शेअर केलेल्या एका खास पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिद्धार्थची ही पोस्ट त्याच्या आईसाठी कौतुकास्पद व अभिमानास्पद असल्याची आहे.

सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. पुण्यात त्यांनी घरगुती खाद्यपदार्थांचा हा व्यवसाय सुरु केला आहे. सीमा चांदेकरांच्या या नव्या दुकानात केवळ घरगुती पदार्थांनाच प्राधान्य दिलं आहे. याबाबत सिद्धार्थनेही त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. सीमा यांच्या या नव्या खाद्य व्यवसायाचे नाव ‘सीमा फूड्स’ असे आहे.

आणखी वाचा – सुंदर सजावट, समुद्र किनारा अन्…; ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडीओ समोर, पत्नी कोण आहे?

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

“नवीन बिज़नेस! नवीन innings! मला तुझा अभिमान आहे आई. पुण्यात आरण्येश्वर चौकात माझ्या आईचं नवं दुकान. सर्व घरगुती गोष्टी. जरुर भेट द्या”, असं कॅप्शन देत सिद्धार्थने त्याच्या आईच्या नव्या दुकानाची झलकही दाखविली आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर कलाक्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर नेटकऱ्यांनी सिद्धार्थच्या आईला कमेंटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – ‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

सिद्धार्थ चांदेकरच्या आईने दुसरं लग्न केलं यावेळी ही त्या चर्चेत आल्या होत्या. सिद्धार्थ व मिताली या दोघांनी पुढाकार घेत त्यांच्या आईचं म्हणजेच सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न लावलं. . अनेकांनी या गोष्टीमुळे त्यांचं भरभरुन कौतुकही केलं. आता सिद्धार्थच्या आईने म्हणजेच सीमा यांनी त्यांचे पती नितीन यांच्या साथीने हा व्यवसाय सुरु केला आहे. या सीमा फूड्सच्या नावाच्या पाटीवर प्रोपा. सीमा नितीन असे नाव दिसत आहे.

Tags: marathi actorMarathi newssiddharth chandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Adnan sami mother death

आईचं निधन, पाकिस्तानने अंत्यसंस्कारालाही येऊ दिलं नाही अन्...; अदनान सामीने सांगितला ‘तो’ काळ, भारताने दया दाखवली पण...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.