Actress Suffer From Health Issue: ‘कृष्णदासी’, ‘तीन बहुराणी’, ‘घरची लक्ष्मी कन्या’ या मालिकांमधून प्रसिद्धी ज्योतात आलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणजे छवी मित्तल.छवी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील विशेष चर्चेत असते. गेल्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं.मात्र शस्त्रक्रिया आणि रेडिओथेरपीनंतर छविने कॅन्सरशी लढा दिला.परंतु कॅन्सरशी लढा दिल्यानंतर छवी आता नवीन आजार सोबत झुंज देते आहे.(Actress Suffer From Health Issue)
पाहा छवी कोणत्या आजाराने ग्रस्त आहे? (Actress Suffer From Health Issue)
छविने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या या आजाराबद्दल भाष्य केले आहे.जिम मधला एका फोटो छविने शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शन मध्ये तिने म्हंटल आहे, “मी बाजारात एक नवीन आजार आणला आहे. त्याचे नाव आहे ‘कॉस्टोकॉन्ड्राइटिस’. ऑस्टियोपेनियासाठी मी घेत असलेल्या इंजेक्शनचे रेडिएशन किंवा साइड इफेक्ट्स असू शकतात किंवा सतत खोकला जो मला काही दिवसांपूर्वी झाला होता.”

छवीने पुढे लिहिलं “मला श्वास घेताना किंवा हातांचा वापर करताना, झोपताना, बसताना, हसताना जवळजवळ प्रत्येक गोष्टीत वेदना होतात. नाही मी याबद्दल नेहमीच सकारात्मक नसते. मी नकारात्मक बनते तेव्हा मी माझ्या आवडत्या जागी जिममध्ये गेले. पण मी एकटी नाही आणि हे दिवसही जातील याची मला खात्री आहे.” कारण, जेव्हा आपण खाली पडतो तेव्हाच उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होतो.(Actress Suffer From Health Issue)
हे देखील वाचा : “खूप वाईट वाटतं कारण…” नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांना दुःख अनावर, म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी…”
छवीच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी तिच्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.छवीच्या कुटुंबात तिचे पती व २ मुलं देखील आहेत.तिचे पती मोहित हुसैन यांची स्वतःची डिजीटल प्रॉडक्शन कंपनी आहे. छवीने लवकरात लवकर या आजारातून बरं व्हावं अशा सदिच्छा चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.