Ira Khan Weight Gain : बॉलिवूड कलाकारांचे स्टारकिड नेहमीच चर्चेत असलेले पाहायला मिळतात. विशेषतः चर्चेत असणाऱ्या या कलाकारांच्या यादीत आमिर खान आणि त्याच्या कुटुंबाचे नाव हे आवर्जून घेतले जाते. आमिर खानची मुलगी आयरा खान बर्याचदा चर्चेत असते. अनेकदा आयरा सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. आयरा खानने सांगितले होते की, तिने नैराश्याशी संघर्ष केला आहे. आयरा खान मानसिक आरोग्याबद्दलही अनेकदा बोलताना दिसली आहे. आयरा खानने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली आहे. जानेवारी २०२४ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. आयराच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. आयरा तिच्या फिटनेसमुळे आता चर्चेत आली आहे आणि अनेकांच्या नजरेस पडत आहे.
आयरा खानचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये आयराच्या वाढत्या वजनाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयरा खानचे वजन बरेच वाढले आहे. अशातच आयराला ओळखणे देखील कठीण होऊन बसले आहे. काही काळापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये, आयरा खान गाडीत थोडी भावुक होऊन बसली होती. त्यामुळे आयराने अधिक लक्ष वेधून घेतलं.
तर आयरा पती नुपूरबरोबरही स्पॉट होताना दिसली. यावेळी आयराने पापाराझींना पोजही दिली. यावेळी तिने ब्लॅक टी -शर्ट आणि जीन्स परिधान केले होते. तिने इयरिंग्ज आणि कमीतकमी मेकअपसह आपला लुक पूर्ण केला. यावेळी तिचा नवरा नुपूरही तिच्याबरोबर दिसला. मात्र यावेळी आयराच्या वाढत्या वजनाची सर्वत्र विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. आयराचे वाढलेले वजन पाहून तिला ओळखणंही कठीण होऊन बसलं. आयराच्या या व्हिडीओवर नेटकरी आयराचे काय झाले आहे याबाबत विचारपूस करताना दिसत आहेत.
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, “यांत नेमकं कोण गोड दिसत आहे”. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “फिटनेस ट्रेनरची पत्नी फिट असणे आवश्यक आहे”. काही लोक आयराला नैराश्याविषयी देखील प्रश्न विचारत आहेत. नुपूर आणि आयराच्या लग्नाची खूप चर्चा सुरु झाली आहे. जॉगिंग करत करत नुपूरने त्याची वरात घेऊन आयराचे घर गाठले. त्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तर आयराचे डेस्टिनेशन वेडिंगही चर्चेत राहिले.