Tharal Tar Mag New Promo: टीआरपीच्या शर्यतीत ज्या मालिकेने आपलं पहिल्या नंबरच स्थान टिकवून ठेवलं आहे ती मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. या मालिकेला सुरुवातीपासून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.सुरुवाती पासून मालिकेत सातत्याने येणाऱ्या रंजक वळणांमुळे प्रेक्षक मालिकेशी जोडले गेले. आणि आजही मालिकेला तितकाच उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे.(Tharal Tar Mag New Promo)
सध्या मालिकेत पूर्णा आजी सायलीचा स्वीकार करत होत्या. परंतु अर्जुनला असं व्हायला नको आहे. अर्जुन पूर्णा आजींच्या मनातून सायलीला उतरवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. पंरतु अर्जुनला त्यात यश येत नव्हते. शेवटी प्रियाच्या जेवणात तिखट मिसळून अर्जुनने त्याचा हेतू साध्य केला. आणि पूर्णा आजींना अखेर पुन्हा सायलीचा नातसून म्हणून स्वीकार केला नाही.
पाहा काय घडणार येत्या भागात? (Tharal Tar Mag New Promo)
अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य अजून कोणासमोर आलेलं नाही. यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.अर्जुन टीशर्ट बदलत असतो तितक्यात प्रिया खोलीत येते .योगायोगाने प्रिया आणि अर्जुन तशा परिस्थितीत खोलीत असतात. तेवढ्यात सायली खोलीत येते आणि त्यांना तस बघते तेव्हा सॉरी सॉरी म्हणत सायली खोलीच्या बाहेर जाते. त्यावेळी प्रिया अर्जुनला म्हणते, ही अशी काय आहे? सायली नक्की तुझी बायकोचं आहे ना? सायलीच्या या अशा वागण्यामुळे अर्जुन-सायलीच्या लग्नाचं सत्य प्रियासमोर येणार का हे बघणं रंजक ठरणार आहे. (tharal tar mag latest episode)

नुकतेच मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले. त्यानिमित्त मालिकेतील सर्व कलाकारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. या मालिकेच्या सर्व टीमचं पडद्यामागे देखील कमाल बॉण्डिंग पाहायला मिळतं. अर्जुन व सायलीच्या जोडीला देखील कायमचं प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे.
हे देखील वाचा : Komal Kumbhar Boyfriend: ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजीचंही ठरलं! वाढदिवसाचं निमित्त साधत दिली प्रेमाची कबुली