Bharti Singh On Thailand Trolling : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान दिवसागणिक वेगवेगळी माहिती समोर येत आहे. दोन देशांमध्ये प्रत्युत्तर सुरुच आहे. अशामध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या गावांमध्ये हल्ल्याबाबत दहशत, भिती आहे. संपूर्ण देशामध्ये भारत-पाकिस्तान हल्ल्याबाबत चर्चा होत असताना कलाक्षेत्रातील मंडळीही स्वतःचा अनुभव सांगत आहेत. काही कलाकारांचे कुटुंबिय जम्मू-काश्मीर, पंजाब लगतच्या शहरांमध्ये राहत आहेत. अली गोणीनेही जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या त्याच्या कुटुबियांबाबत चिंता व्यक्त केली होती. तर अभिनेत्री-कॉमेडियन भारती सिंहचे कुटुंबियही अमृतसरमध्ये दडपणाखाली आहेत. मात्र भारती थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. याचबाबत तिला ट्रोल करताच भारती एक व्हिडीओ शेअर केला आहे. (bharti singh family in Amritsar)
भारतीने तिच्या युट्युब चॅनलद्वारे एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती रडत आहे. “तुझं कुटुंब अमृतसरमध्ये दहशतीखाली राहत आहे आणि तू थायलंड फिरते. तुला लाज वाटली पाहिजे”, “देशात तनाव आहे आणि तू थायलंड फिरत आहेस” असं म्हणत भारतीला ट्रोल करण्यात आलं. याचबाबत भारतीने आता संपूर्ण माहिती दिली आहे. कुटुंबिय अमृतसरमध्ये असल्याचं तिने व्हिडीओच्या सुरुवातीलाच मान्य केलं. तसेच ते सुरक्षित असल्याचंही म्हटलं.
आणखी वाचा – बॉलिवूड कलाकार सरकारविरोधात का बोलत नाहीत?, जावेद अख्तर म्हणाले, “ईडी, सीबीआय पाठी लागली तर…”
भारती म्हणाली, “हो शहर, देशांमध्ये मोठ्या घटना घडत आहेत. पण माझं कुटुंब सुरक्षित आहे. मला माझ्या देशावर व सरकारवर पूर्ण विश्वास आहे. भारत एक भक्कम देश आहे. त्याला कोणीच काही करु शकत नाही. मी जेव्हा कमेंट्स वाचते तेव्हा मला राग येत नाही. मला तुम्ही लोक खूप साधे असल्याचं जाणवतं. मी थायलंडमध्ये काम करण्यासाठी आली आहे. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेले नाही. दहा दिवसांचं आमचं शूट होतं. ३ ते ४ महिन्यांपूर्वीच आम्ही हा प्रोजेक्ट साइन केला होता. या प्रोजेक्टसाठी खूप तयारी करण्यात आली होती. ऐनमोक्यावर शूट असताना सोडून देणं योग्य वाटत नाही”.
आणखी वाचा – रणवीर अलाहाबादियाने पाकिस्तानी लोकांची मागितली माफी, भारतीयच राग करतात म्हणाला अन्…; नेटकरी भडकले
वाईट कमेंट आणि खोट्या बातम्या वाचून त्रास होत असल्याचंही भारती म्हटलं. याविषयी बोलताना ती खूप रडली. भारती म्हणाली, “मी तणावामध्ये येते आणि खूप रडते. वाईट कमेंट्स मला अधिक प्रभावित करतात. मी या कमेंट्सकडे दुर्लक्ष करु शकत नाही. कारण तुम्ही सगळे माझ्या कुटुंबाचा भाग आहात. मला माझ्या देशावर व सरकारवर विश्वास असल्याचं मी पुन्हा एकदा स्पष्ट करते. तुम्ही सगळे माझं कुटुंबच आहात जे कठीण काळात मला काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. कारण शो सुरु राहिला पाहिजे”. भारतीने अगदी सुंदर शब्दांत सगळ्यांना चोख उत्तर दिलं आहे.