‘इंडियन आयडल १२’ या शोचा विजेता आणि गायक पवनदीप राजन याच्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आज सकाळी ३.४० मिनिटांच्या सुमारास पवनदीपचा मोठा अपघात झाला. कारमध्ये असताना हा अपघात घडला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान अपघातानंतरचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये पवनदीपला ओळखणंही कठीण झालं आहे. अपघातानंतरची गंभीरता लक्षात घेता पवनदीपवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. सध्या तो रुग्णालयात असून डॉक्टर योग्य ते उपचार करत आहेत. पवनदीपची अपघातानंतरची अवस्था पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. (indian idol 12 winner pawandeep rajan accident)
आता पवनदीपची अवस्था कशी?
अपघाताचे फोटो समोर आल्यानंतर दिसलेली भयानक परिस्थिती थरकाप उडवणारी आहे. पवनदीपची कार पाठून येऊन थेट ट्रकला धडकलेली दिसत आहे. यामध्ये कारचा चक्काचुर झाल्याचं चित्र समोर आलं आहे. फोटोंमध्ये कारची अवस्था पाहून हा अपघात किती मोठा असावा हे लक्षात येतं. पण हा अपघात नेमका कसा झाला? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. व्हिडीओ समोर आल्यानंतर पवनदीपला कुठे कुठे दुखापत झाली? हे दिसत आहे. त्याच्या दोन्ही हातांना मोठी दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे.
पवनदीप राजन कोण?
पवनदीप राजन उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यामध्ये राहणारा आहे. त्याचे वडील सुरेश राजन, आई सरोज राजन, बहीण ज्योतिदीप राजन तिघेही कलाक्षेत्रात काम करतात. ‘द वॉईस ऑफ इंडिया’ शोमधून पवनदीपच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने ‘इंडियन आयडल १२’ शोचं विजेतपद पटकावलं. या शोनंतर त्याचं नशीबच बदललं. देशभरात पवनदीपला त्याच्या नावाने ओळखलं जातं. त्याने गायलेल्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत.
आणखी वाचा – ‘समसारा’ चित्रपटाचे युनिक पोस्टर समोर, दमदार कलाकारांसह मराठीमध्ये नवा प्रयोग, उत्सुकता वाढली

आणखी वाचा – दोन लेकींनंतर पुन्हा मुलीलाच दिला जन्म, आई-वडील रुग्णालयातच सोडून गेले अन्…; डॉक्टरांनी असं काही केलं की…
संगीतक्षेत्रामध्ये पवनदीपने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘इंडियन आयडल १२’मध्येही बरोबरीने ताकदीचे स्पर्धक असताना त्याने विशेष मेहनत घेत विजेतेपद पटकावलं. इतकंच नव्हे तर त्याने त्याच्या गाण्यांचे अल्बम करण्यासही सुरुवात केली आहे. इतर सिगिंग रिएलिटी शोमध्येही तो हजेरी लावताना दिसतो. गुरुची भूमिका सांभाळतो. नव्या येणाऱ्या गायकांना प्रशिक्षण देतो. आता पवनदीप लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.