स्वतःचं हक्काचं घर असावं, त्याला आपल्या आवडीनुसार सजवावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कलाकारांच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कलाकार दिवस-रात्र मेहनत करत असतात. या मेहनतीमधूनच स्वतःसाठी एखादं घर घेतात आणि छान इंटेरियरही करतात. अमृता खानविलकर, प्रसाद ओक, अक्षय केळकर, रवी जाधव अशा कित्येक कलाकारांनी आपलं घर अगदी सुंदर रित्या सजवलं. त्यांचं हक्काचं घर घेण्याचं एक स्वप्न पूर्ण झालं. आता यामध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीची भर पडली आहे. मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा साक्षी गांधीने घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे मुंबई-पुणेमध्ये घर न घेता तिने चिपळूणमध्ये घर घेतलं. (Marathi actress sakshi Gandhi new home)
चिपळूणमध्ये हक्काचं घर
साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करत आनंदाची बातमी दिली. तिने घर तयार होतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. तसेच घर तयार झाल्यानंतर कसं दिसत आहे? हे दाखवलं. साक्षीने जसं ठरवलं तसंच घर सजवलं आहे. घरातील प्रत्येक कोपरा हा लक्ष वेधून घेणारा आहे. घरातील रंग-संगतीही विशेष आकर्षक ठरते. साक्षीच्या व्हिडीओच्या सुरुवातीलाच घराची नेमप्लेट दिसते. तिने ही नेमप्लेट खास तयार करुन घेतलेली आहे. चाफ्याच्या फुलांनी नेमप्लेट सजवण्यात आली आहे.
हॉलमध्ये असणारा झोपाळा अगदी सुंदर आहे. घरात देवांच्या मुर्ती ठेवण्यासाठी विशेष जागा तयार करण्यात आली आहे. हॉलमध्ये असणारी मोठी खिडकी घराचं मुख्य आकर्षण ठरते. विशेष म्हणजे साक्षीने ओपक किचनची कल्पना सत्यात उतरवली. हॉलमधून किचन दिसेल असंच ठेवलं. किचनचं इंटेरियरही साधंच पण सुंदर आहे. प्रत्येक जागेचा अगदी पुरेपुर उपयोग करण्यात आला आहे. घरातील एक कोपरा प्रत्येकाच्या आवडीचा असतो. साक्षीने खिडकीमध्येच हा सुंदर कोपरा तयार केला आहे.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा – अनिल कपूर यांच्या आईला अखेरचा निरोप, कपूर कुटुंबिय दुःखात एकत्र, भावुक व्हिडीओ समोर
शिवाय दोन्ही बेडरुम आणि त्याचं इंटेरियर आकर्षित करणारं आहे. खरं तर शहरात बंगला न उभारता तिने निसर्गरम्य वातावरणात स्वतःचं घर तयार केलं. साक्षीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “…आणि घर झालं. हॅशटॅग चिपळूण. नवीन घर, गणपती बाप्पा मोरया”. साक्षीने व्हिडीओ शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकार मंडळींनी साक्षीच्या या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. खूप भारी साक्षी, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे, खूप खूप अभिनंद अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर तिचं सुंदर घर पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.