‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मुळे नवोदित गायक नावारुपाला आले. त्यातीलच एक गायिका म्हणजे अभिनेत्री कार्तिकी गायकवाड. कार्तिकीने आजवर गायनक्षेत्रात कमावलेलं नाव उल्लेखनीय आहे. तिच्या कुटुंबियांकडूनच कार्तिकीला गायनाचा वारसा मिळाला. वडीलांसह कार्तिकीचे भाऊही याच क्षेत्रात कार्यरत आहे. शिवाय वर्षानुवर्षे कार्तिकीही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. विठुरायाच्या चरणीही गायनसेवा करते. आता गायकवाड कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ गायकवाडची लगीनघाई सुरु झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. आता लवकरच कौस्तुभ लग्नबंधनात अडकणार आहे. यादरम्यानचाच व्हिडीओ कार्तिकीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. (kartiki gaikwad brother wedding)
कौस्तुभ व त्याची होणारी पत्नी काव्याचा साखरपुडा अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडला. यावेळी गायकवाड कुटुंबियांचा शाही थाट पाहायला मिळाला. कार्तिकीही भावाच्या साखरपुड्यात मानाने मिरवत होती. आताही ती लग्न विधींमध्ये स्वतः लक्ष घालत आहे. तसेच प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे. आनंदाने जगत आहे. कौस्तुभच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्याच्या लग्नाचा घाणा तसेच बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या भावाची लगीनघाई, शेअर केले लग्न ठरल्यानंतरचे फोटो, शुभेच्छांचा वर्षाव
पाहा व्हिडीओ
घाणा भरताना गावाकडील मंडळी गाणी म्हणतात. शहरात हे दृश्य फारसं पाहायला मिळत नाही. मात्र गावी विधींसाठी जमलेल्या स्त्रिया गाणी आवर्जुन म्हणतात. आता कार्तिकी भावाच्या घाणा कार्यक्रमाला गाणी म्हणत आहे. परंपरा जपत तिने घाणा भरताना या विधीशी निगडीत गाणं म्हटलं आहे. तिच्या या गाण्याल सगळ्यांनी मिळून उत्तम दादही दिली आहे.
आणखी वाचा – ‘फॅमिली मॅन ३’ फेम अभिनेत्याचा मृत्यू, जंगलामध्ये आढळला मृतदेह, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
कार्तिकीने शेअर केलेल्या व्हिडीओचं आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे सजावट. घाणा भरण्याच्या कार्यक्रमासाठी मोठी सजावट करण्यात आली. फुलांच्या सजावटीने लक्ष वेधून घेतलं. तसेच विविध मुर्तीही ठेवण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी कार्तिकीने पारंपरिक साडी परिधान केली होती. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडाही होता. विशेष म्हणजे खांद्यावर पदर घेत तिने परंपरा जपली. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेक चाहतीमंडळी कौतुक करत आहेत.