मराठीत कटेंट हाच राजा आहे हे पुन्हा एकदा ‘देवमाणूस’ चित्रपटामुळे सिद्ध झालं आहे. महेश मांजरेकर व रेणूका शहाणे यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. ‘देवमाणूस’च्या ट्रेलरवरुनच संपूर्ण चित्रपटाच्या कथेचा प्रेक्षकांनी अंदाज बांधला. उतार वयात असलेल्या जोडप्याची कथा मोठ्या पडद्यावर कशी खुलत जाणार? याविषयी तुमच्या-आमच्या मनात अनेक प्रश्न होते. ट्रेलर पाहून चित्रपटाची ताकद काय असेल हे लक्षात आलं. चित्रपट प्रेक्षकांची नाराजी तर करणार नाही ना ही धाकधूकही होती. ‘देवमाणूस’ खरंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे का?, आणि हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा? हे आपण आज जाणून घेऊया. (devmanus Marathi movie)
महेश मांजरेकर, रेणूका शहाणे यांच्यासह सिद्धार्थ बोडके आणि सुबोध भावेची यांची महत्त्वाची भूमिका ‘देवमाणूस’मध्ये आहे. नाती जपताना उलगडत जाणारं रहस्य, क्षणाक्षणाला उत्कंठता वाढवणारे सीन्स प्रेक्षकांना कथेशी बांधून ठेवतात. केशव (महेश मांजरेकर) व लक्ष्मी (रेणूका शहाणे) यांचं उतारवयातील आयुष्य आणि त्याभोवती गुरफटलेलं रहस्य म्हणजे चित्रपटाचा जीव आहे. इन्स्पेक्टर रवी देशमुख (सुबोध भावे) चित्रपटात भलताच भाव खाऊन जातो. शिवाय कथेतील इतर पात्रं भलतील भाव खाऊन जात आहेत.
‘देवमाणूस’ पाहण्याची प्रमुख कारणं
1) महेश मांजरेकर व रेणूका शहाणे यांची उतारवयातील केमिस्ट्री चित्रपटाच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारी आहे. केशव व लक्ष्मी यांच्यातील गोड व प्रेमळ क्षण ठळकपणे दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. कठीण प्रसंगामध्ये अडकल्यानंतरही केशव व लक्ष्मी एकमेकांना कशी साथ देतात? हे पाहण्यासारखं आहे.
२) कथा रहस्यमय असताना मध्यांतरापूर्वीच चित्रपट भलताच वेग धरतो. चित्रपटातील प्रत्येक सीन हा तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. चित्रपटाच्या शेवटाकडे असताना ‘देवमाणूस’च नाव का? हे समजतं.
आणखी वाचा – “दहशतवाद इस्लाम धर्मामधूनच…”, दहशतवादी व धर्मावरुन शाहरुख खानचा जुना Video Viral, म्हणाला, “आमच्या धर्मात…”
३) मध्यंतरापूर्वी चित्रपटाची कथा वेगाने पुढे सरकते. मात्र उत्तरार्धात ‘देवमाणूस’ची कथा अधिकाधिक रंजक ठरते. रहस्य, नाती यामधील गुंता सोडवण्यात आणि प्रेक्षकांना यामध्ये गुंतवून ठेवण्यात ‘देवमाणूस’ यशस्वी ठरतो.
४) या कथेतील कटकारस्थानं, केशव व लक्ष्मी, इन्स्पेक्टर रवी, दिलीप यांचं आयुष्य कोणतं निर्णायक वळण घेतं? हे पाहण्यासाठी ‘देवमाणूस’ आवश्य पाहावा.
५) चित्रपटातील कलाकारांचा दमदार अभिनय कौतुकास्पद आहे. महेश व रेणूका या ऑनस्क्रीन जोडीने तर कमालच केली आहे. शिवाय चित्रपटाचे शूट लोकेशनही कथेला योग्य न्याय देणारं आहे. सई ताम्हणकरची लावणीही पाहण्याजोगे आहे. या कथेचा जीव व ‘देवमाणूस’ नक्की कोण? हे जाणून घेण्यासाठी ‘देवमाणूस’ चित्रपट नक्की पाहावा.
लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे. मराठीतील ही उत्तम कलाकृती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अवश्य जावं.
मज्जा रेटिंग – चार स्टार