मराठी चित्रपटांचा चाहता जगभरात आहे. कटेंटच मराठी चित्रपटांचा राजा आहे असं सातत्याने म्हटलं जातं. चित्रपट पाहिल्यानंतर याची प्रचिती येतेच. आता मराठी चित्रपटसृष्टी आणखी एक अभिमानाच क्षण सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. एक किंवा दोन नव्हे तर तब्बल चार मराठी चित्रपटांची निवड कान आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes Film Festival) करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दादर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबत घोषणा केली. मराठीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये मानाचा तुरा मिरवणारे हे चार मराठी चित्रपट नक्की कोणते? ते पाहुयात. (Marathi films in cannes film festival)
‘जुनं फर्निचर’, ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ व ‘खालिद का शिवाजी’ हे चित्रपट कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय स्थरावरही मराठी चित्रपटांचा बोलबाला असावा हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. फ्रान्समध्ये १४ मे ते २२ मे २०२५ दरम्यान कान फिल्म फेस्टीव्हल रंगणार आहे. या फेस्टिव्हलला जगभरातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित असतात. या मंडळींच्या उपस्थित चार मराठी चित्रपटांना मानाचं स्थान मिळालं आहे. कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये निवड झालेल्या चार मराठी चित्रपटाबाबत जाणून घेऊया.
जुनं फर्निचर
‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच या चित्रपटात मुख्य भूमिकाही महेश यांचीच आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याभोवती फिरणारा हा चित्रपट. वृद्धापकाळामध्ये आपलीच मुलं आपल्यापासून कशी दुरावतात?, त्याचमुळे ज्येष्ठ नागरिकांवर होणारे परिणाम चित्रपटात मांडण्यात आले आहेत. मेधा मांजरेकर, समीर धर्माधिकारी, अनुषा दांडेकर, शरद पोंक्षे यांसारख्या कलाकारांची चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
आणखी वाचा – ‘फ्रँड्री’मधल्या शालूने बदलला धर्म, फोटो शेअर करताच ट्रोल, मोठा निर्णय अन्…
खालिद का शिवाजी
‘खालिद का शिवाजी’ चित्रपट एका वेगळ्याच कथेवर आधारित आहे. कथेतील खालिद नावाचा मुलगा मुस्लिम धर्मीय आहे. त्यामुळे त्याच्या अवतीभोवती असणारी मुलं त्याला कशाप्रकारे वागणूक देतात? हे सांगणारा हा चित्रपट आहे.
आणखी वाचा – “मुडदा परत आला, बायकांना…”, ‘देवमाणूस ३’च्या प्रोमोमध्ये सरु आजीच्या डायलॉगची हवा, डॉक्टरने घाबरवत…
स्थळ
‘स्थळ’ हा चित्रपट लग्नसंस्थेवर आधारित आहे. ग्रामीण भागातील अरेंज मॅरेज लग्नाची पद्धत यावर या चित्रपटाची कथा आहे. तसेच प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा सामाजिक दृष्टीकोन ‘स्थळ’मध्ये दाखवण्यात आला आहे. सचिन पिळगांवकर प्रस्तुत या चित्रपटात नंदिनी चिकटे मुख्य भूमिकेत आहे.
स्नो फ्लॉवर
‘स्नो फ्लॉवर’ हा चित्रपट रशिया व कोकण या दोन संस्कृतींचं दर्शन घडवणारा आहे. गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच छाया कदम, विठ्ठल अहिरे, वैभव मांगले यांसारखे सुप्रसिद्ध कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.