मनोरंजन क्षेत्रामधील प्रभावी माध्यमांपैकी एक माध्यम म्हणजे ओटीटी. वेबसीरिजमुळे कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं. इतकंच नव्हे तर आपली कला नव्याने सादर करण्याची संधी मिळते. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘दहावी अ’ वेबसीरिज. ITSMAJJA च्या या वेबसीरिजने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘आठवी अ’ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दुसऱ्या सीझनची प्रेक्षक मागणी करत होते. सीरिजला मिळणारं प्रेम पाहता निर्मात्यांकडूनही ‘दहावी अ’ची मोठी घोषणा करण्यात आली. आता दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. याचबाबत आता एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. (Dahavi a webseries episodes)
‘दहावी अ’चे एपिसोड पुढचे काही आठवडे फक्त सोमवारी १.३० वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यापूर्वी दर आठवड्याच्या सोमवारी, गुरुवारी १.३० वाजता एपिसोड येत होते. मात्र हा निर्णय मुलांच्या परीक्षेमुळे घेण्यात आला आहे. याचबाबत रेश्मा म्हणजेच संयोगिता म्हणाली, “आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. गेल्या महिन्यात आमची परीक्षा सुरु असल्यामुळे आम्हाला शूट करण्यास वेळ मिळाला नाही. पुढचे काही आठवडे आता फक्त सोमवारी एपिसोड येतील”.
आणखी वाचा – मच्छरांच्या मृत्यूची नोंद ठेवणारी मुलगी, मेल्यावर पेपरवर चिटकवूनही ठेवते, नाव, ठिकाण, वेळ लिहिते अन्…
दाद्या म्हणजे विनीत असं म्हणाला की, “जशी तुमची परीक्षा सुरु आहे तशी या मुलांचीही परीक्षा सुरु आहे. शूटसाठी या सगळ्यांना कमी वेळ देता आला. म्हणूनच काही आठवड्यांसाठी फक्त सोमवारी हे एपिसोड येतील. त्यानंतर काही आठवड्यांनी आपण सोमवारी व गुरुवारी एपिसोड प्रदर्शित करु. तुम्ही असंच आमच्यावर प्रेम करत राहा”. ‘दहावी अ’च्या संपूर्ण टीमने अगदी प्रेमाने हा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे.
आणखी वाचा – २५ दिवसांनंतर अथिया शेट्टी व केएल राहुलने पहिल्यांदाच लेकीला दाखवलं, नावही ठेवलं खास, अर्थ आहे…
‘दहावी अ’ची टीम सध्या मुंबई दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान या कलाकारांची अनेक स्वप्न पूर्ण झाले. मुंबई इंडियन्सच्या लाइव्ह शोमध्ये कलाकारांना जाण्याची संधी मिळाली. तसेच १७ एप्रिलला वानखेडेमध्ये झालेल्या सामन्यालाही हे कलाकार उपस्थित होते. यावेळी त्यांनी बरीच धमाल-मस्ती केली. शिवाय मुंबईतील बऱ्याच प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. ‘दहावी अ’ला मुंबईतही मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम खरंच कौतुकास्पद आहे.